एक्स्प्लोर

लॉकडाऊनसंदर्भात गृहमंत्री अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. लॉकडाऊन (Lockdown) संदर्भात राज्यांच्या भूमिका काय आहेत याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : कोरोना  व्हायरसच्या संकटामुळं देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळं घोषित केलेला चौथा लॉकडाऊन सध्या सुरु आहे. हा लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. लॉकडाऊन संदर्भात राज्यांच्या भूमिका काय आहेत याबाबत यात चर्चा केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन वाढवला जावा की नको या विषयावर चर्चा केली. सोबतच कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काय प्रभावी पावलं उचलली जाऊ शकतात, यावर मुख्यमंत्र्यांची मतं जाणूण घेतली. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असून केवळ दोन दिवस उरलेले असताना अजून पुढची भूमिका काय असेल याबाबत स्पष्टता नाही. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोरोनाच्या स्थितीवर विस्तारपूर्वक चर्चा केली. सोबतच पुढे काय करायचं यावर देखील सूचना त्यांनी मागवल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अधिकतर मुख्यमंत्र्यांनी पुढील निर्णय केंद्रानेच घ्यावा असं मत मांडलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी दरवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा व्हायची. मात्र अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अमित शाह नेहमी हजर असायचे. आता पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील रणनीती तयार करावी असं सांगितलं असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशभरात पहिल्या लॉकडाऊनची घोषणी केली होती. पहिला लॉकडाऊन 21 दिवसांसाठी घोषित करण्यात आला होता. दुसऱ्यांदा हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत आणि त्यानंतर 17 मे पर्यंत वाढवण्यात आला. चौथ्या टप्प्यात लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही? याबाबत केंद्र सरकार चर्चा करत आहे. तसेच यामध्ये निर्बंध शिथील करणे आणि अन्य काही सूट द्यावी याबाबत अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget