एक्स्प्लोर

केंद्रीयमंत्री अमित शाहांना श्वसनाचा त्रास, दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी दाखल

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा  एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये काल रात्री अकराच्या सुमारास त्यांना दाखल केलं. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 18 ऑगस्टला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केलं होतं. अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. आपल्या ट्वीटमध्ये अमित शाह म्हणाले, आज माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जे केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

याआधी अमित शहा यांना 18 ऑगस्टला पुन्हा नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अमित शाह यांच्यावर उपचार सुरु होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget