एक्स्प्लोर

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा VIDEO समोर, वडिलांनी दिला होता 'हा' सल्ला

रशिया-युक्रेन युद्धात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Russia-Ukraine War : युक्रेनमधील (Ukraine War) युद्धात अडकलेल्या 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा रशियाच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. नवीन एसजी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी होता. रशिया-युक्रेन युद्धात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दोन दिवसांपूर्वी नवीन त्याच्या वडिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलला होता, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाला वडिलांनी दिला 'हा' सल्ला

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नवीन त्याच्या वडिलांशी बोलताना दिसत आहे. या विद्यार्थ्याचे कुटुंबीयांशी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते,  नवीन जेवण आणण्यासाठी बाहेर गेला होता, त्यावेळी झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. याला कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील दुजोरा दिला आहे. वृत्तानुसार, खार्किवच्या सेंट्रल स्क्वेअरवरील प्रशासकीय इमारतीवर रशियाने हल्ला केला. या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाल्याचे समजते. संवादादरम्यान नवीनच्या वडिलांनी मुलाला स्वतःची काळजी व एकत्र राहण्यास सांगितले. त्यावेळी त्याला आणण्यासाठी भारतीय दूतावासाकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी मुलाला सांगितले होते. नवीनच्या मृत्यूची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून दिली.

 

परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “आज सकाळी खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आम्ही अत्यंत दुःखाने सांगत आहोत. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. नवीन हा युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता आणि तो चौथ्या वर्षात शिकत होता. नवीन हा कर्नाटकातील चालगेरी येथील रहिवासी होता. परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

युक्रेनच्या महिलेने नवीनच्या समन्वयकाला सांगितली माहिती

युक्रेनमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. नवीनच्या समन्वयक पूजा प्रहराज यांनी एबीपी न्यूजला माहिती दिलीय. तिने सांगितले की, नवीनचा मित्र त्याच्याकडे पैसे घेण्यासाठी आला होता, तेव्हा युक्रेनमधील एका महिलेला नवीनच्या मित्राचा फोन आला. भाषा न समजल्यामुळे नवीनच्या मित्राने पूजाला युक्रेनियन महिलेशी बोलायला लावले. युक्रेनच्या महिलेने माहिती दिली की, रशियन हल्ल्यात भारतीय मुलाचा मृत्यू झाला आहे आणि रुग्णवाहिका त्याचा मृतदेह घेऊन जात आहे. त्याने पूजाला सांगितले की ती नवीनच्या फोनवरच बोलत आहे.

संबंधित बातम्या

Russia Ukraine War: रशियन बॉम्ब हल्ल्यात युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Russia Ukraine War: खाद्यपदार्थ आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् घात झाला.... रशियन बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

 

 

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget