(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ujjain Mahakal Corridor : हर हर शंभो! उज्जैनमध्ये महाकालेश्वराचं भव्य कॉरिडोर तयार, 11 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
Mahakal Corridor : मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे या भव्य अशा मंदीर परिसराचा निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे या कॉरिडोरचा आकार काशी विश्वनाथ मंदिरापेक्षा तब्बल चार पटीने मोठा आहे. यासाठी जवळपास 750 कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
Mahakal Corridor Ujjain : मध्य प्रदेशमधील (MP) उज्जैन (Ujjain) येथे भव्य अशा मंदीर परिसराचा निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे या कॉरिडोरचा (Mahakal Corridor) आकार काशी विश्वनाथ मंदिरापेक्षा तब्बल चार पटीने मोठा आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी या कॉरिडॉरला भेट दिली. पाहणीनंतर त्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, ''आतापर्यंतचं काम पाहून मी समाधानी आहे. 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवीन कॉरिडॉरचे उद्घाटन करणार आहेत. महाकाल कॉरिडॉरचे काम दोन टप्प्यात केले जात असून त्यासाठी सुमारे 750 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे संपूर्ण कॉरिडॉर सुमारे 900 मीटर परिसरात बांधण्यात आलं आहे.
भारत की संस्कृति एवं जीवनमूल्य एवम परम्पराओं का दुनिया भर में प्रचार-प्रसार हो रहा है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 19, 2022
मैंने माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी जो सांस्कृतिक राष्ट्रवाद की ध्वजा पताका लेकर चल रहे हैं, उन्हीं से प्रार्थना की है कि वह महाकाल महाराज के परिसर के प्रथम चरण का लोकार्पण करें। pic.twitter.com/5EBrgOSDdV
स्थानिकांना रोजगारही मिळणार
या भव्य कॉरिडोरचा आकार अत्यंत भव्य असल्याने याठिकाणी विविध गोष्टी भक्तांसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये शिव तांडव स्तोत्र, शिव विवाह, महाकालेश्वर वाटिका, महाकालेश्वर मार्ग, शिवअवतार वाटिका, प्रचार हॉल, नूतन शाळा परिसर, गणेश विद्यालय परिसर, रुद्रसागर तट विकास, अर्धपथ परिसर, धर्मशाळा आणि पार्किंग सेवा या साऱ्याचा समावेश आहे. या सर्वामुळे या कॉरिडॉरमध्ये दर्शन आणि फेरफटका मारताना भाविकांना एक खास अनुभव मिळणार आहे. हे कॉरिडॉर चालवण्यासाठी सुमारे एक हजार लोकांची गरज लागणार असल्याने येथील स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.
- महाकाल का भव्य कॉरिडोर बनकर तैयार
— Ambarish Pandey (@pandeyambarish) September 19, 2022
- पीएम @narendramodi 11 अक्टूबर को इसका उदघाटन करेंगे#Mahakaal #Ujjain #Corridor@ZeeBusiness @ChouhanShivraj pic.twitter.com/qDWKXECnwN
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
महाकाल कॉरिडोरचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाले होते. हा संपूर्ण मंदिर परिसर दोन हेक्टरमध्ये असून त्यासाठी सुमारे 750 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बांधकामाच्या एकूण खर्चापैकी 422 कोटी रुपये राज्य सरकार, तर 21 कोटी रुपये मंदिर समिती आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे. कॉरिडोरच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबरला कॉरिडॉरचे उद्घाटन करणार असल्याची माहिती दिली. त्यादृष्टीने सर्व तयारीही पूर्ण झाली असल्याचं ते म्हणाले.
हे देखील वाचा -
- Cheetah in India : भारतात 'चित्ता' परतला, पंतप्रधानांनी आठ चित्ते कुनो अभयारण्यात सोडले
- Indian Railways: तुमचं रेल्वे प्रवासाचं कन्फर्म तिकिट दुसऱ्याला हस्तांतरीत करू शकता? जाणून घ्या पद्धत