एक्स्प्लोर

Corona Vaccine : आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार, UIDAI चे स्पष्टीकरण

जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर त्याला अत्यावश्यक सुविधा देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही असं UIDAI ने स्पष्ट केलं आहे. 

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने स्पष्ट केलं आहे की एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात भरती न करणे किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणं या गोष्टी आता बंद होणार आहेत. या कारणांसाठीही आता आधार बंधनकारक नसणार असल्याचं UIDAI ने स्पष्ट केलं आहे.

अत्यावश्यक सेवांसाठी आता आधारची गरज नाही
देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना UIDAI चा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय. या आधी अनेकदा केवळ आधार कार्ड नसल्याने लोकांना अत्यावश्यक सेवा तसेच अनेक वस्तूंपासून वंचित ठेवलं जायचं. कोरोना रुग्णाना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. तसेच उपचार आणि औषधांसाठीही या गोष्टी घडताना दिसत होत्या. आता UIDAI च्या स्पष्टीकरणामुळे या गोष्टीवर पडदा पडला आहे. 

देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेकदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नव्हतं. त्यामुळे रुग्णालयेही अशा रुग्णांना भरती करुन घ्यायला नकार द्यायचे. आता या गोष्टीसाठी आधार कार्डची गरज नसल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

कोरोनाची लस घ्यायची असेल तर आपली ओळख म्हणून आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना लस मिळणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच गेली चार महिने यावर कोणतेही स्पष्टीकरण केंद्र सरकार वा UIDAI कडून आलं नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या संभ्रमात वाढ झाली होती. आता हा प्रश्न सुटला असून एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरीही त्याला आता कोरोनाची लस मिळणार आहे हे स्पष्ट झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget