पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये चकमक, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद, बसंतगढला सुरक्षा दलाने वेढले
Udhampur: या भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले .शोधपथके बेरोले भागात पोहोचतात अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला .

Pahalgam Terror Attack: दक्षिण कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड जवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली .दहशतवाद्यांच्या आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे . गेल्या 24 तासात जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही सलग तिसरी चकमक आहे .(Udhampur Enounter)
गेल्या दोन दिवसांपासून उधमपूरमध्ये चकमक
गेल्या दोन दिवसांपासून भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे .एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उदमपूर जिल्ह्यातील दुडुपसंतगड भागात सध्या गोळीबार सुरू आहे .घनदाट जंगल आणि धोकादायक भूप्रदेशासाठी ओळखला जाणारा हा परिसर भारतीय लष्कराच्या अधिकार क्षेत्रात येतो .या भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले .शोधपथके बेरोले भागात पोहोचतात अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला .
Based on specific intelligence, a joint operation with Jammu and Kashmir Police was launched today in Basantgarh, Udhampur. Contact was established, and a fierce firefight ensued. One of our Bravehearts sustained grievous injuries in the initial exchange and later succumbed… pic.twitter.com/klN9RqL1Rq
— ANI (@ANI) April 24, 2025
ही चकमक उंचावरच्या प्रदेशात होत असून आजूबाजूला घनदाट जंगल आहे .या भागात असंख्य नैसर्गिक गुहा आणि लपण्याची ठिकाणे असल्याने दहशतवादी सुरक्षा दलांपासून लपण्यासाठी या भागाचा अनेकदा वापर करतात . सध्या सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली . चकमकीत एक जवान शहीद झाला आहे . पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 24 तासात झालेली ही सलग तिसरी चकमक आहे .हा परिसर बसंतगडपासून चालत जवळजवळ तीन तासांच्या अंतरावर आहे .उन्हाळ्यात अनेक मेंढपाळ गुरे चरण्यासाठी ही जागा वापरतात .
दरम्यान बुधवारी (23 एप्रिल ) जम्मू आणि काश्मीर मधील पुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता .त्याचवेळी 23 एप्रिल रोजी सकाळी बारा मुलाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेष जवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता .यावेळी सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.
हेही वाचा:























