एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे
![पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे Two Years Complited On Man Ki Baat पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/28121622/man-ki-baat-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 2014 रोजी मोदींनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आजच्या 24 व्या कार्यक्रमातूनही ते जनतेशी संवाद साधणार आहेत.
ऑल इंडिया रेडिओवरुन 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाचे पहिल्यांदा प्रसारण झालं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जनतेशी संवाद साधण्यासोबतच जनतेकडून त्यांचे प्रश्न, मते मागितली आहेत. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही सहभागी घेऊन भारतीयांशी संवाद साधला होता.
आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून काळा पैसा, स्वच्छ भारत अभियान, व्यसनाधिनता आदी विषयांसोबतच लहान मुलांनाही या कार्यक्रमात सहभागी करुन घेत परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले होते.
उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय बोलतील याकडे आज साऱ्या देशवासियांचे लक्ष्य लागून आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)