एक्स्प्लोर
फोनवरुन तोंडी तिहेरी तलाक दिला, सहा जणांवर गुन्हा
सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढल्याचा प्रकार फोनवर सांगत असताना पतीने रागात फोनवरच तोंडी तिहेरी तलाक दिला. याप्रकरणी पीडितेने पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लखनौ : नुकतेच तोंडी तिहेरी तलाकच्या विरोधातील विधेयक लोकसभेत पारित झालेलं असताना फोनवरच तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर येथे घडली आहे. सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढल्याचा प्रकार फोनवर सांगत असताना पतीने रागात फोनवरच तोंडी तिहेरी तलाक दिला. याप्रकरणी पीडितेने पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तलाक पीडितेचा एक वर्षापूर्वी रामपूर येथील फकरुद्दीन याच्याशी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच पीडितेला सासरच्या मंडळींनी माहेरहून पाच लाख रुपये आणि कारसाठी पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच तिच्या सासऱ्याने तिच्यासोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्नही केला असल्याचं पीडितेने सांगितलं. तिने या संबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता, तीच्या पतीने तीला माहेरी सोडलं होतं.
त्यानंतर पीडित महिला सासरी परतली असता सासरच्या लोकांनी तिला मारहाण करत घरातून बाहेर काढलं. दिल्लीत बिर्याणीचं दुकान चालवत असलेल्या तिच्या पतीला हा प्रकार सांगण्यासाठी तिने फोन केला असता, त्याने फोनवरच तिला तोंडी तलाक दिला. त्यानंतर पीडितेने अजीम नगर पोलीस स्थानकात पती फकरुद्दीनसह पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
प्रांतधिकारी राहुल कुमार यांनी आलेल्या तक्रारीनुसार कारवाई सुरु असल्याचं सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement