एक्स्प्लोर

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अखेर लोकसभेत मंजूर

हे विधेयक कुठलाही धर्म किंवा समाजाविरोधात नाही तर महिलांचे हक्क आणि त्यांच्या सन्मानासाठी असल्याचं केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालं. 245 विरुद्ध 11 अशा फरकाने हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. विधेयकातील सुधारणांवर मतदान सुरु असताना काँग्रेस, समाजवादी पक्ष, राजद आणि एआयएडीएमकेच्या खासदारांनी सभात्याग केला. विधेयकावरील चर्चेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. हे विधेयक कुठलाही धर्म किंवा समाजाविरोधात नाही तर महिलांचे हक्क आणि त्यांच्या सन्मानासाठी असल्याचं केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं. सती, बालविवाहासारख्या परंपरांचा नायनाट करतानाही अशा विरोधाला सामोरं जावं लागलं होतं, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. देशात समान नागरी कायदा लागू केला तर तिहेरी तलाकच्या कायद्याची गरज पडणार नाही, अशी भूमिका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी घेतली. तिहेरी तलाक हा विषय मोठा असून, संयुक्त संसदीय समितीमार्फत यावर अभ्यास व्हावा अशी भूमिका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा स्वागतार्ह असल्याचं सांगतानाच दोषी पतीला तुरुंगवास भोगावा लागण्याला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाला विरोध करत मुस्लिम संस्कृती आणि मान्यतेचं उल्लंघन असल्याचं म्हटल. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकाबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं. तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत दुसऱ्यांदा सादर झालं. मागच्या वेळी राज्यसभेत हे विधेयक पास होऊ न शकल्यामुळे तो अध्यादेश रद्दबातल ठरला होता. तिहेरी तलाक विधेयकात तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तिहेरी तलाक विधेयकातील सुधारणा तिहेरी तलाकसंदर्भातील नवे विधेयक लोकसभेत 17 डिसेंबर रोजी मांडण्यात आले. या सुधारित विधेयकामध्ये काही बदल सरकारने केले आहेत. नव्या बदलानुसार, केवळ पीडित आणि तिचे जवळचे नातेवाईकच याप्रकरणी गुन्हा दाखल करू शकणार आहे, त्रयस्थ व्यक्ती नाही. जर प्रकरण सामोपचाराने मिटत असेल तर केस मागे घेण्याचा अधिकार महिलेला असणार आहे. महिलेने तिची बाजू सांगितल्यानंतर पतीला जामीन द्यायचा की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget