(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP Parliamentary Party Meeting : भाजपच्या संसदीय दलाची आज बैठक, सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश
आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाची आज बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत.
BJP Parliamentary Party Meeting : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकामध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाची आज बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीला सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान यांच्यासोबतच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीला पक्षाने आपल्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. लोकसभेत भाजपचे 301 खासदार आहेत, तर राज्यसभेत 97 खासदार आहेत. या बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर झाले होते. ज्यामध्ये भाजपने पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये भाजपला यळ मिळाले नाही. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार कामगिरी केली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा कोणताही फायदा भाजपला झाला नाही. पंजाबमध्ये जरी भाजपने चांगली कामगिरी केली नसली तरी इतर राज्यात पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. यूपीमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. 37 वर्षांनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार पुन्हा आले आहे.
दरम्यान आज होणऱ्या भाजपच्या बैठकीत या पाच राज्यातील निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. शेवटची बैठक 21 डिसेंबर 2021 रोजी झाली होती. त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी संसदेत खासदारांच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. जोपर्यंत खासदार स्वतःमध्ये बदल करत नाहीत तोपर्यंत बदल होऊ शकत नाही, असा इशाराही यावेली मोदींनी दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या: