एक्स्प्लोर
महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांना वीरमरण, शहीदांचा आकडा 18 वर
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 18 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळचे विकास जनार्दन कुळमेथे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
या हल्ल्यामुळे महाराष्ट्राचंही अतोनात नुकसान झालं आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 18 जवानांपैकी 4 जवान महाराष्ट्रातले आहेत.
लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, शिपाई संदीप सोमनाथ ठोक, शिपाई पंजाब जानराव उईके आणि शिपाई के विकास जनार्दन अशी या शहीदांची नावं आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खंडनगळीचे होते. शिपाई पंजाब जानराव उईके अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते. तर विकास जनार्दन कुळमेथे मूळचे यवतमाळमधील पुराड गावतील होते.
उरी हल्ल्यातील शहीद जवानांचा आकडा 18 वर, उपचारादरम्यान आणखी एक जवान शहीद, यवतमाळच्या के विकास जनार्दन यांना वीरमरण
महाराष्ट्रातील तीन शहीद जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत जाहीर
उरीमध्ये पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज, लष्कर मुख्यालयाजवळ जोरदार स्फोटाचा आवाज
LIVE UPDATE : उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वा. उच्चस्तरीय बैठक, संरक्षणमंत्री, एनएसए यांच्यासह गृहसचिव, रॉ, आयबी प्रमुखही बैठकीला उपस्थित राहणार
LIVE UPDATE : तीनही शहीद जवानांचं पार्थिव पुण्यात आणणार, पुण्यातून पार्थिव मूळगावी पाठवले जाणार
------------------------------
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्राचंही अतोनात नुकसान झालं आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 17 जवानांपैकी 3 जवान महाराष्ट्रातले आहेत.
लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, शिपाई संदीप सोमनाथ ठोक आणि शिपाई पंजाब जानराव उईके अशी या शहीदांची नावं आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खंडनगळीचे होते. शिपाई पंजाब जानराव उईके अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.
पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी
सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट उसळली आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याची भावना भारतीय सैन्य दलाकडून व्यक्त केली जात आहे. सीमारेषेवर अतिरिक्त कुमक पाठवून भारत सरकारनं नेहमी होणाऱ्या या हल्ल्यांविरोधात ठोस पावलं उचलावीत, असं मत सैन्यदलाकडून व्यक्त केलं जात आहे. 26/11 ते पठाणकोट हल्ला, आणखी किती सहन करायचं असा सवाल सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानची भारताला आण्विक हल्ल्याची धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला किंवा सीमेत कोणी पाऊल ठेवलं तर आण्विक हल्ला करण्यासाठीही घाबरणार नाही, असं आसिफ यांनी म्हटलं आहे.जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद
अमरावतीचे शहीद शिपाई पंजाब जानराव उईके नाशिकचे शहीद शिपाई संदीप सोमनाथ ठोकसाताऱ्याचे शहीद लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे
उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती
उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला असून, ठार झालेले चारही दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याचं समोर आलं आहे. तसंच या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर आणि त्याचा भाऊ रौफ असगर असल्याची माहिती समोर येते आहे. या हल्ल्यासाठी एकूण 16 अतिरेक्यांची टोळी भारतात घुसल्याचं लष्करानं मान्य केलं. त्यामुळे अजूनही 12 अतिरेकी हे काश्मीरमध्ये मोकाट असू शकतात, अशी माहितीही लष्करानं दिली आहे.पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement