एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदींच्या जीवाला धोका : रामदेव बाबा

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटल आहे. दहशतवाद्यांच्या पैशांवरच टाच आल्याने मोदींच्या जीवाला धोका असल्याची भीती रामदेव बाबांनी व्यक्त केली आहे.
रामदेव बाबा म्हणाले की, "काळा पैसा संपवण्यासाठी, आर्थिक आणि राजकीय गुन्ह्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमुळे अतिरेक्यांना आर्थिक पाठिंबा मिळत होता. मात्र या नोटा बंद झाल्याने दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मोदींना दहशतवादी, राजकीय माफिया, ड्रग माफियांपासून धोका आहे."
"देशातील प्रत्येकाने प्रामाणिक पंतप्रधानांचं समर्थन करायला हवं, त्यांना सहकार्य करायला हवं. मात्र काहीजण ट्विटर, फेसबुकवर त्यांच्यावर टीका करत आहेत," असंही रामदेव बाबा म्हणाले.
आणखी वाचा























