Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील आजची सुुनावणी रद्द, सरन्यायाधीश उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी होणार नाही
Hearing In Supreme Court: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी सर्वेच्च न्यायालयाने मणिपूर सरकारला खडसावले होते. त्याप्रकरणी होणारी आजची सुनावणी रद्द करण्यात आली आहे.
Manipur Violence Hearing In SC: सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) शु्क्रवारी (28 जुलै) मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी सर्वेच्च न्यायलयामध्ये होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार होती. परंतु सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या खंडपीठापुढे सुनावणी करता येणार नाही. त्यामुळे मणिपूरच्या प्रकरणावरील शुक्रवार (28 जुलै) रोजी होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितले होते. दरम्यान, या प्रकणावर अजून कारवाई का केली नाही? असा सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला विचारला होता. त्यानंतर केंद्र सरकारने मणिपूर व्हिडीओ प्रकरणावरील सुनावणीच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी (27 जुलै) न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले आहे.
केंद्र सरकराने सुनावणीच्या एक दिवस आधी दाखल केले प्रतिज्ञापत्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारकने राज्य सरकारची संमती घेतल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटलं आहे की, या प्रकरणावर जलद गतीने तपास करणं गरजेचं आहे. तसेच हे प्रकरण राज्याबाहेर चौकशी करण्याची परवानगी देण्याचे आवहन देखील केंद्र सरकाने केले आहे. तसेच आरोपपत्र दाखल झाल्यापासून सहा महिन्यांच्या आतमध्ये ट्रायल कोर्टालाही निर्णय देण्याचे निर्देश द्यावेत,असं आवाहन केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात केले आहे.
35 हजार अतिरिक्त फौजफाटा तैनात
सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात गृह मंत्रालयाकडून देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच येथील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी 35 हजार अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कुकी आणि मेतई या दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मणिपूरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मणिपूर संदर्भातली प्रत्येक माहिती घेत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या प्रकणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तर विरोधी पक्षांच शिष्टमंडळ 29 आणि 30 जुलै रोजी मणिपूरचा दौरा करणार आहेत.