एक्स्प्लोर
Advertisement
पहिला सर्जिकल स्ट्राईक मोदींच्याच काळात, DGMO कडून शिक्कामोर्तब
पीटीआयने आरटीआयअंतर्गत संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत माहिती मागवली होती. त्याला DGMO ने उत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याकडून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक हा पहिलाच सर्जिकल स्ट्राईक होता. यापूर्वी भारताकडून कोणताही सर्जिकल स्ट्राईक केल्याची नोंद सैन्याकडे नाही. माहिती अधिकारात मागवलेल्या अर्जाला भारतीय सैन्याने उत्तर दिलं आहे.
भारताने 29 सप्टेंबर 2016 पूर्वी सर्जिकल स्ट्राईक केल्याची कोणतीही नोंद सैन्याकडे नाही, अशी माहिती डायरक्टरेट जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स (DGMO) यांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कार्यकाळात भारताने पहिला सर्जिकल स्ट्राईक केला, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
पीटीआयने आरटीआयअंतर्गत संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत माहिती मागवली होती. संरक्षण मंत्रालयाने हा अर्ज डीजीएमओकडे पाठवला होता. ज्यामध्ये भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक हा आतापर्यंतचा पहिला सर्जिकल स्ट्राईक होता, असं सांगण्यात आलं. दरम्यान भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक हा पहिलाच सर्जिकल स्ट्राईक होता, असं यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं.
उरीचा बदला, भारताचं सर्जिकल स्ट्राईक
उरीमध्ये भारतीय जवानांच्या कॅम्पवरील हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईक केला होता. एलओसी पार करुन भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
संबंधित बातम्या :
…म्हणून अमावस्येच्या आदल्या रात्री ‘सर्जिकल स्ट्राईक’!
सर्जिकल स्ट्राईक: डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला
सैन्याचा अपमान करु नका, भाजपचा केजरीवालांवर हल्लाबोल
सर्जिकल स्ट्राईक निव्वळ बनाव, संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप
व्हायरल सत्य: सर्जिकल स्ट्राईकमध्ये 'हे' जवान सहभागी होते का? सर्जिकल स्ट्राईकनंतर पाक लष्करप्रमुखांकडून लढाऊ विमानांची पाहणी सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांना धडकी, पाकव्याप्त काश्मीरमधून पळअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement