एक्स्प्लोर

पिता-पुत्राच्या भांडणात दोन सूनांमधील राजकीय वर्चस्वाची लढाई पणाला

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या यादवीत मुलायम सिंह यांची लहान सून अपर्णाने एन्ट्री घेतल्याने वेगळे वळण मिळाले आहे. आखिलेश यादव यांचा सावत्र भाऊ प्रतीक यादवची पत्नी अपर्णाच्या एन्ट्रीने दोन सुनांमध्ये राजकीय वर्चस्वाची चढाओढ पाहायला मिळत आहे. मुलायम सिंह यादव यांनी डिसेंबरमध्ये समाजवादी पक्षाची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी आपली दुसरी पत्नी साधना गुप्ताचा लहान मुलगा प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णाला लखनऊ कॅटमधून समाजवादी पक्षाचा उमेदवारी दिली. अपर्णाची उमेदवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना चांगलीच झोंबली. कारण मुलायम सिंहांचा दुसरा मुलगा प्रतीक शिवपाल यादवांच्या गोटातील असल्याने, मुलायम यांनी अखिलेश यादव यांना धोबीपछाड दिला होता. अपर्णाला उमेदवारी मिळाल्यापासू तिनेही सोशल मीडियावर विविध विषयांवरुन आपली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली. सूत्रांच्या माहितीनुसार, आखिलेश यादव यांनी साधना गुप्तांच्या कुटुंबियांची राजकारणातील प्रवेशाला सातत्याने विरोध केला. यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतीक यादव यांची राजकीय कारकीर्द सुरु होण्यापूर्वीच आखिलेश यांनी खोडा घालून थांबवली. यानंतर अखिलेश यांनी मुख्यमंत्री पदाचा खुबीने वापर करुन पक्षावरील पकड मजबूत बनवली, अन् त्यातूनच आपल्या वडिलांसमोरच उभा डाव मांडला. अखिलेश यांच्या या धोबीपछा़डामुळे मुलायम सिंह यादव यांनीही आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली.  त्यांनी आखिलेश विरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे अखिलेश यांनी ही लढाई प्रतिष्ठेची बनवली. अखिलेश यांनी पक्षातील वजन वापरुन काका शिवपाल यादव यांना घरचा रस्ता धरायला लावला, अन् अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे मुलायम सिंह यांना निवडणुक आयोगाचे दार ठोठवावे लागले. एकीकडे ही यादवी सुरु असताना, दुसरीकडे अपर्णाच्या एन्ट्रीने आणखीनच भर पडली. अपर्णाच्या एन्ट्रीने अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्यातही राजकीय वर्चस्वाची चढाओढ सुरु झाली. मुलायम सिंह यादव यांची मोठी सून आणि अखिलेशची पत्नी डिंपल यादव ही सध्या कनोजमधून खासदार आहे. तर दुसरी सून आणि प्रतीकची 20 वर्षीय पत्नी अपर्णाला राजकारणात प्रवेश करायचा आहे. डिंपल ही कॉमर्स ग्रॅड्यूएट असून, ती एका माजी सैनिक अधिकाऱ्याची मुलगी आहे. तिचा सर्वाधिक वेळ हा राजकारणापेक्षा गावच्या कॉन्टेनमेटमध्येच जातो. राजकारणातही तिला रस नसल्याने पक्षाअंतर्गत त्यांना अनेकवेळा विरोध झाला. 2009 च्या निवडणुकीत तिला राजकारणात उतरवल्यानंतरही डिंपल पाच मिनीटापेक्षा जास्त वोलू शकत नव्हती. तर दुसरीकडे अपर्णा ही पेशाने गायिका असून, ती एका निवृत्त पत्रकाराची मुलगी आहे. लहानपणापासून वडिलांच्या सानिध्यात राहिल्याने तिच्या राजकीय महत्त्वकांक्षा प्रचंड वाढल्या आहेत. शिवाय विविध कार्यक्रमातून तिने वेळोवेळी आपल्या विरोधकांचा समाचार घेत आपली राजकारणातील महत्त्वकांक्षा अधोरेखित केली आहे. तिच्या लग्नावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. तर गेल्या ऑक्टोबर महिन्यात एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी तिच्या राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वाद विकोपाला गेल्यापासून अखिलेश यादवच्या पत्नी डिंपल यादव या अखिलेशच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. अखिलेशच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या अखिलेश यांच्या सावलीप्रमाणे वावरत आहेत. तर दुसरीकडे अपर्णा यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून विविध व्यासपीठावरुन आपली महत्त्वकांक्षा व्यक्त करत आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या या यादवीत या दोन्ही सुनाही एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. आता यात कुणाची सरशी होणार हे उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Embed widget