New Labour Code : देशात नवीन 4 लेबर कोड लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, ओव्हरटाईम, पीएफवर परिणाम होणार
जर सर्व काही ठीक झाल्यास 1 जुलैपासून कामगार संहितेचे नवीन नियम लागू होतील. त्याच्या अंमलबजावणीमुळे पगार, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा, पीएफ योगदान, ग्रॅच्युइटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
New Labour Code : देशात 4 कामगार संहिता (लेबर कोड) लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जर सर्व काही ठीक झाल्यास 1 जुलैपासून कामगार संहितेचे नवीन नियम लागू होतील. त्याच्या अंमलबजावणीमुळे पगार, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा, पीएफ योगदान, ग्रॅच्युइटी इत्यादींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने कामगार संहितेबाबत एक मसुदा तयार केला होता. यानंतर राज्यांना त्यांच्या वतीने नियम तयार करण्यास सांगण्यात आले. अलीकडेच, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री, रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, केवळ 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मसुदा नियम तयार केला आहे.
काय आहे केंद्राच्या मसुद्यात
केंद्र सरकारच्या मसुद्यानुसार कामाचे कमाल 12 तास वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हे दर आठवड्याला 4-3 गुणोत्तरांमध्ये विभागले गेले आहे. सोप्या भाषेत समजले तर 4 दिवस ऑफिस, 3 दिवस आठवड्याची सुट्टी. त्याचा हिशोब पाहिला तर कर्मचाऱ्यांना ४ दिवसांत 48 तास म्हणजे रोज 12 तास काम करावे लागेल. दर 5 तासांनी अर्ध्या तासाची विश्रांती प्रस्तावित आहे.
ओव्हरटाईम, पीएफवर परिणाम
जर कर्मचारी आठवड्यातून 48 तासांपेक्षा जास्त काम करत असेल तर ओव्हरटाइम दिला जाईल. मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असावे. मूळ पगार वाढल्याने तुमचा पीएफही वाढेल. त्यामुळे निवृत्तीनंतर मिळणार्या पेन्शनच्या रकमेत वाढ होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या कामगार संहितेत प्रोत्साहन, वैद्यकीय विमा आणि इतर सुविधांचा प्रस्ताव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या