एक्स्प्लोर
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलगी नमिताकडून मुखाग्नी
मानसकन्या नमिता भट्टाचार्यने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. दिलदार आणि जिंदादिल राजकारणी असलेल्या वाजपेयींना निरोप देण्यासाठी देशा-विदेशातील मान्यवरांची पावलं, स्मृतीस्थळाकडे वळली.
नवी दिल्ली: देशाच्या राजकाराणातील महाऋषी, भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. संध्याकाळी पाचच्या सुमारास दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळी वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसकन्या नमिता भट्टाचार्यने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
अजातशत्रू, हळव्या मनाचा कवी, अभ्यासू पत्रकार, दिलदार आणि जिंदादिल राजकारणी असलेल्या वाजपेयींना निरोप देण्यासाठी देशा-विदेशातील मान्यवरांची पावलं, स्मृतीस्थळाकडे वळली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते.
दुसरीकडे भूतानचे राजा वांगचूक, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनीदेखील वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.
वाजपेयींना अखेरचा निरोप देताना मोदी, अडवाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले.
सुरुवातीला तिनही दलाच्या प्रमुखांनी वाजपेयींना मानवंदना दिली. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा आणि हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंह धानोआ यांनी वाजपेयींनी सलामी दिली. यानंतर विविध मान्यवरांनी वाजपेयींना श्रद्धा सुमनं वाहिली.
जवानांनी वाजपेयींच्या पार्थिवावरील तिरंगा कुटुंबीयांना सुपुर्द केला. वाजपेयींची नात निहारिका यांनी तिरंगा मानाने स्वीकारला.
अंत्यसंस्कारापूर्वी वाजपेयींना तीनशे जवानांकडून मानवंदना अर्पण करण्यात आली.
राष्ट्रीय स्मृतीस्थळ मंत्रोचारांच्या स्वराने धीरगंभीर झाला होता. तर वाजपेयींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
मोदी, फडणवीस, अमित शाह अंत्ययात्रेत सहभागी
भाजप मुख्यालयातून अलोट गर्दीत वाजपेयींचा अखेरचा प्रवास सुरु झाला. दुपारी दोनच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी भाजपचे सर्व दिग्गज नेते अंत्ययात्रेत उपस्थित होते. दिल्लीतील रस्त्यावर एकच गर्दी उसळली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप मुख्यालय ते राष्ट्रीय स्मृती स्थळ 5 किमीचं अंतर चालत पूर्ण करत, अंत्ययात्रेत सहभागी झाले.
निवासस्थानी दिग्गजांची श्रद्धांजली
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव काल रात्री आठच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानीही मोठी गर्दी झाली होती. नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी वाजपेयींचं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतलं.
त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास वाजपेयींचं पार्थिव भाजप मुख्यालयात नेण्यात आलं.
राष्ट्रीय स्मृतीस्थळ
नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती या ठिकाणी अटलजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रीय स्मृतीस्थळावर ज्या ठिकाणी वाजपेयींचं स्मारक असेल ते ठिकाण हे पंडित नेहरु यांचं समाधीस्थळ शांतीवन आणि लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक विजय घाट यांच्या मध्ये आहे.
स्मारकासाठी स्वतंत्र जागा कमी पडू लागल्यानंतर एकाच ठिकाणी राष्ट्रीय स्मृती नावाने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची स्मारकं बनवली गेली आहेत.
राष्ट्रीय स्मृतीस्थळावर ग्यानी झेलसिंग- एकता स्थळ, के आर नारायणन- उदय भूमि, शंकर दयाळ शर्मा -कर्मभूमी, चंद्रशेखर -जननायक स्थळ, इंदिरा गांधी यांचं शक्ती स्थळ, राजीव गांधी यांची वीरभूमी अशी समाधी स्थळांची नावं आहेत.
राजकारणातला महाऋषी हरपला
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं काल संध्याकाळी निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी वाजपेयींनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
अटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काल संध्याकाळपासून त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवलं होतं. तर आज सकाळी दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालयात ठेवण्यात आलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
राष्ट्रीय स्मृती स्थळ इतकं महत्त्वाचं का?
वाजपेयींच्या आयुष्यातील 'राजकुमारी कौल' कोण होती?
वाजपेयी म्हणाले होते 'राजीव गांधींमुळे मी जिवंत!'
'मेरे अटल जी', मोदींच्या ब्लॉगचं मराठी भाषांतर
पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी गांगुलीला 'हे' गाणं ऐकवलं
अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरणादायी कविता
राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन
वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया
सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?
मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement