एक्स्प्लोर

खिल्ली उडवणाऱ्या शोभा डेंचे लठ्ठ पोलिसांकडून आभार, कारण...

गेल्या वर्षी डे यांनी ट्विट केल्यानंतर जोगावत यांनी वजन कमी करण्याचं मनावर घेतलं.

मुंबई: स्तंभलेखिका शोभा डे यांनी ट्विट करुन केलेल्या अपमानाचा चांगलाच फायदा मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलीस अधिकारी दौलतराम जोगावत यांना झाला आहे. कारण गेल्या वर्षी डे यांनी ट्विट केल्यानंतर जोगावत यांनी वजन कमी करण्याचं मनावर घेतलं. इतकंच नाही तर त्यांनी मुंबई गाठून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे जोगावत आता 180 किलोवरुन थेट 115 किलोवर आलेत. त्यांनी एकूण 65 किलो वजन घटवलं आहे. इतकंच नाही तर डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी करण्याचं लक्ष्य दौलतराम जोगावत यांनी ठेवलंय. मुफज्जल लकडावाला यांनी जोगावत यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली हे विशेष. मुंबईतील सैफी रुग्णालयात जोगावत यांच्यावर गॅस्ट्रिक बायपास प्रोसिजर झाली. या सगळ्या प्रकारानंतर जोगावत यांनी शोभा डे यांचे आभार मानलेत. त्यांनी ट्विट केल्यामुळेच वजन कमी करण्याचा आपण गांभीर्यानं विचार केला, असं जोगावत म्हणाले. इतकंच नाही तर आणखी 30 किलो वजन कमी केल्यावर मी शोभा डे यांना नक्की भेटेन असंही ते म्हणाले. सध्या जोगावत मध्य प्रदेशातील नीमच शहरातील कंट्रोल रुममध्ये तैनात आहेत. ते पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होतील. पुढील दीड वर्ष जोगावत यांना लिक्वीड डाएट देण्यात येणार आहे. त्यानुसार दौलतराम यांचं वजन शंभर किलोने कमी करण्याचा प्रयत्न असेल. सोबतच त्यांचा रक्तदाब आणि मधुमेहही नियंत्रणात येणार आहे. जोगावत यांच्यावर मोफत उपचार होणार आहेत. मध्य प्रदेश सरकारची इच्छा असल्यास, ते हा खर्च उचलू शकतात, मात्र दौलतराम यांच्याकडून एकही पैसा घेतला जाणार नसल्याचं सैफी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. खरं तर, माझं वजन माझ्या कामात कधीच अडथळा ठरलं नाही, मी कायमच अॅक्टिव्ह होतो आणि गुन्हे सोडवण्यासाठी माझा मेंदू तत्पर आहे. माझ्या कामासाठी माझा गौरवही झाला आहे, असं जोगावत म्हणाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारीला शोभा डे यांनी एक फोटो ट्वीट करुन 'हेवी पोलिस बंदोबस्त इन मुंबई टुडे' असं कॅप्शन दिलं होतं. भारदस्त दौलतराम यांचा फोटो पाहून मुंबई पोलिसांनी हा आपल्या पोलिस खात्यातील अधिकाऱ्याचा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर सोशल मीडियावर यूझर्सनी शोभा डे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. संबंधित बातम्या

मध्य प्रदेशच्या 'त्या' पोलिस अधिकाऱ्याकडून शोभा डेंचे आभार

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget