Terror Attack: बॉर्डरवरील सैन्य दलाच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला, 5 जवान जखमी, हाय अलर्ट जारी
हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली आहे
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले असून बसमधून हे हवाई दलाचे जवान जात असल्याची माहिती आहे. देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सीमारेषेवर सैन्य दलाकडून आणि देशात सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट व कडक बंदोबस्त तैनात आहे. मात्र, दहशवादी हल्ल्याची घटना घडल्याने सीमारेषेवरील पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहिम सुरू केली आहे.
हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली आहे. शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आतमधील इतरही सर्व वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत. या हल्ल्यात 5 लष्करी जवान जखमी झाले असून त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील शोधमोहिम सुरू आहे.
An Indian Air Force vehicle convoy was attacked by terrorists in the Poonch district of J&K. The local Rashtriya Rifles unit has started cordon and search operations in the area. The vehicles have been secured inside the air base in the General area near Shahsitar. Military… pic.twitter.com/y5uMnAUBfw
— ANI (@ANI) May 4, 2024