एक्स्प्लोर

...तर 2050 पर्यंत भारतात राहणे कठीण होईल, तापमान वाढ रोखण्यासाठी काय करावं?

उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर 2050 पर्यंत भारतात राहणे कठीण होईल असा दावा सायन्स डायरेक्ट मॅगझिनमध्ये केलाय.  

Temperature News : दिवसेंदिवस देशात तापमानाचा (Temperature) पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच्या पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय. दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीनं (Delhi) तापमानाचे आत्तापर्यंतचे सर्व मोडले आहेत. दिल्लीत तापमानाचा पारा हा 50 अंशाच्या पुढे गेलाय. दिल्लीत आज 52.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. दिल्लीनं तापमानाचा गेल्या 100 वर्षाचा विक्रम मोडला आहे. दिल्लीतील मुंगेशपूरमध्ये 52.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. दरम्यान, उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर 2050 पर्यंत भारतात राहणे कठीण होईल असा दावा सायन्स डायरेक्ट मॅगझिनमध्ये केलाय.  

तापमानाच मोठी वाढ होताना दिसत आहे. असेच तापमान वाढत राहिले तर 2050 पर्यंत भारतात राहणे कठीण होईल असा दावा सायन्स डायरेक्ट मॅगझिनमध्ये करण्यात आलाय. उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर 2050 पर्यंत भारतीय भूमीवर राहणे कठीण होईल. जूनपूर्वीच वाढत्या तापमानाने देशाच्या अनेक भागात हाहाकार माजवला आहे. परिस्थिती अशी आहे की, देशातील बहुतांश भागात तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. 

तापमान वाढण्यामागे हवामानातील बदल हेच कारण

दिल्लीत तापमानाचा पारा 52 अंशावर गेल्या. तर चुरूमध्ये 50.5 अंश सेल्सिअस आणि सिरसामध्ये 50.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 2024 च्या सुरुवातीपासून तापमानात वाढ दिसून येत आहे. फेब्रुवारी ते मे या कालावधीत प्रत्येक महिन्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. तापमान वाढण्यामागे हवामानातील बदल असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सअभावी देशात उष्णता वाढल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. 

उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात

वातावरणातील उष्णता रोखण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक प्रकारचे संशोधन करत आहेत.  तंत्रज्ञान ज्याद्वारे शास्त्रज्ञ तापमान कमी करण्याची आशा करतात. जास्तीत जास्त झाडे लावून आणि तेल आणि वायूचा वापर कमी करूनच उष्णता कमी होऊ शकते असं बहुतांश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारताची परिस्थिती पाहिली तर एकीकडे तेल आणि वायूचा वापर वाढत आहे तर दुसरीकडे झाडे तोडण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. सायन्स डायरेक्ट मासिकानुसार, उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर 2050 पर्यंत भारतीय भूमीवर राहणे कठीण होईल. मासिकानुसार 2050 मध्ये सरासरी तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढू शकते.

तापमान कमी करण्यासाठी 'या' उपायोजना करा 

झाडांची कत्तल थांबवावी 

सध्या भारतात बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या 5 वर्षांत विकास आणि बांधकामाच्या नावाखाली 1 कोटीहून अधिक झाडे तोडण्यात आली आहेत. केंद्राने संसदेत दिलेल्या निवेदनानुसार 2016-19 या वर्षात देशात 76 लाख 76 हजार झाडे सरकारने कापली. 2020-21 मध्येही विकासाच्या नावाखाली 30 लाख झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, सरकारने झाडे तोडण्याऐवजी झाडे लावल्याचा दावा केला आहे. सरकारी आकडे सोडले तर गेल्या 20 वर्षांत देशात 23 लाख हेक्टर जंगल नष्ट झाले आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचने 2023 मध्ये ही आकडेवारी जाहीर केली होती.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 2002 ते 2023 या काळात भारतात सर्वाधिक जंगलतोड आसाम, मिझोराम, अरुणाचल, नागालँड आणि मणिपूरमध्ये झाली आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, 2015-20 दरम्यान भारतातील जंगलतोड दर वर्षी 668,000 हेक्टर होती, जी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च आहे.

बांधकामातही मोठ्या प्रमाणात वाढ

बांधकाम क्षेत्रातही भारत मागे नाही. गेल्या दशकात त्यात कमालीची वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2014-23 पासून राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात 60 टक्क्यांची वाढ झालीय. रस्ते मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2014 मध्ये 91 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले होते. जे आता 1 लाख 41 हजार किमी पार केले आहे. या काळात 4 लेनचे बांधकामही 2 टक्क्यांनी वाढले आहे. कनेक्टिव्हिटीच्या नावाखाली ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामातही मोठी वाढ झाली आहे. केंद्राच्या मते, 2014 मध्ये दररोज 11.6 किमी ग्रामीण रस्ते बांधले जात होते, जे 2023 मध्ये 28 किमी प्रतिदिन होईल.

रस्त्यांबरोबरच इमारतींचे बांधकामही झपाट्याने वाढले आहे. ग्लोबल कन्स्ट्रक्शन पर्स्पेक्टिव्ह आणि ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सनुसार, 2025 मध्ये भारतात 1.1 कोटी घरे बांधली जातील. अन्य एका खासगी एजन्सीच्या मते, बांधकाम क्षेत्रात खूप वाढ झाली आहे आणि 2030 पर्यंत या क्षेत्रात 1 अब्ज कामगार असतील.

मोठ्या प्रमाणात वाहनांच्या खरेदीमुळं तापमानात वाढ

कार आणि इतर वाहने देखील तापमान वाढवण्यात मोठा हातभार लावतात. युनिव्हर्सिटी कोऑपरेशन फॉर ॲटमॉस्फेरिक रिसर्चनुसार, पेट्रोलवर चालणाऱ्या कार कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायू सोडतात. ज्यामुळं तापमान वाढते. गेल्या दशकात भारतातील ऑटोमोबाईल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या मते, 2020-21 मध्ये भारतात 1 कोटी 86 लाख मोटारगाड्या विकल्या गेल्या. 2023-24 मध्ये ही संख्या वाढून 2 कोटी 36 लाख झाली आहे. जर आपण 2011 बद्दल बोललो तर या वर्षी भारतात 1.5 कोटी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या 3 वर्षात प्रवासी वाहनांच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे, तर तीन चाकी वाहनांच्या विक्रीत या काळात 3 पट वाढ झाली आहे.

एअर कंडिशनरचा वापर वाढला

भारतामध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी एअर कंडिशनरचा वापर हा ट्रेंड बनला आहे, त्यामुळे त्याची विक्री आणि वापर लक्षणीय वाढला आहे. एका अहवालानुसार 2010 च्या तुलनेत 2023 मध्ये भारतात एअर कंडिशनरच्या विक्रीत 3 पटीने वाढ झाली आहे. सध्या भारतात प्रत्येक 100 पैकी 24 घरांमध्ये एअर कंडिशनर वापरले जातात. याच अहवालात 2050 पर्यंत भारतातील प्रत्येक 100 पैकी 72 घरांमध्ये एसी असेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये एसीची विक्री सर्वाधिक आहे. IEA-50 नुसार, भारतात एसीची मागणी 15 टक्क्यांनी वाढली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एसी आपल्या सभोवतालचे तापमान 2 अंशांपर्यंत वाढवते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की एसीमुळे तापमान वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा वापर करण्याची वेळ. लोक साधारणपणे रात्री आणि पहाटे सर्वात जास्त एसी वापरतात. सकाळचे वातावरण शांत असते आणि एसीमधून निघणारी उष्णता तापमानात मिसळते. त्यामुळं तापमानात वाढ होते. 

महत्वाच्या बातम्या:

अंगाची लाही लाही... दिल्लीत पारा 52.3 अंशावर, तापमानाने 100 वर्षाचा विक्रम मोडला; जून महिना आणखी 'ताप'दायक ठरणार

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Embed widget