Telangana Lockdown Lifted : लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं तेलंगणा देशातील पहिले राज्य, रुग्णसंख्या घटल्यानंतर घेतला मोठा निर्णय
तेलंगणा सरकारने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेलंगणा हे पूर्णपणे लॉकडाऊन हटवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेलंगणा हे पूर्णपणे लॉकडाऊन हटवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या अगोदर राज्य सरकारने 19 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्याना नागरिकांना काही सूट देण्यात आली होती.
तेलंगणा सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, असं जाहीर केलं आहे. तेलंगणा राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या 1,417 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कोरोनाच्या एकूण 6,10,834 नोंद करण्यात आली होती. 12 कोरोनाच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाच्या मृत्यूची संख्या 3,546 गेली होती. तेलंगना राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती ही माहिती दिली आहे.
तेलंगणा सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, असं जाहीर केलं आहे. तेलंगना राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या 1,417 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कोरोनाच्या एकूण 6,10,834 नोंद करण्यात आली होती. 12 कोरोनाच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाच्या मृत्यूची संख्या 3,546 गेली होती. तेलंगना राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती ही माहिती दिली आहे.
हैदराबाद नगर निगम (जीएचएमसी) मध्ये सर्वात अधिक म्हणजे 149 रुग्णांची नोंद करण्यात आले. त्यानंतर रंगारेड्डीमध्ये 104 आणि खम्मम मध्ये 93 रुग्णांची नोंद झाली आहे. बुलेटीननुसार 24 तासात 1,897 कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे 5,88,259 कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा पोहचला आहे. तेंलगणामध्ये मृत्यू दर 0.58 टक्के आहे. तर बरे होण्याचा त्रास 96.30 टक्के आहे.
संबंधित बातम्या :
Pimpri-Chinchwad Lockdown : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून निर्बंध शिथिल, काय सुरु, काय बंद? वाचा महत्वाचे मुद्दे