UPSC 2022 Results: यूपीएससी टाॅपर इशिता किशोरसह 125 विद्यार्थ्यांच्या यशात तेलंगणा डीजीपी महेश भागवत यांच्या मराठमोळ्या अधिकाऱ्यांच्या टीमचा 'खारीचा वाटा'!
महेश भागवत आणि त्यांचे मित्र, देशभरातील वरिष्ठ आयएएस अधिकार्यांचा समावेश असलेली टीम दररोज दोन तास देत मार्गदर्शन करतात. ते उमेदवारांना WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून प्रशिक्षण देतात.
UPSC 2022 Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2022 Results) गुणवत्ता यादीत चमकलेल्या टाॅपर इशिता किशोरसह 600 जणांना मार्गदर्शन करण्याचे काम तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत (TS Additional DGP CID Mahesh M Bhagwat) यांच्यासह अधिकाऱ्यांच्या टीमने केले होते. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून तब्बल 126 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यूपीएससीमध्ये देशात प्रथम आलेली इशिता किशोरसह 600 विद्यार्थ्यांना डीजीपी महेश भागवतांसह अधिकाऱ्यांच्या टीमने दररोज दोन तास देत बहुमोल मार्गदर्शन केले होते. त्यांची मेहनत फळाला आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातील 126 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहे.
12 जण टाॅप 100 जणांच्या यादीत
यूपीएससी परीक्षेत देशात अव्वल ठरलेली इशिता किशोरला भागवत आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या टीमने प्रशिक्षण दिले होते. तिच्याशिवाय स्मृती मिश्रा (4), कृतिका गोयल (14), जीवीएस पवन दत्ता (22), संदीप कुमार (24), संखे काश्मीरा किशोर (25), यादव सूर्यभान अच्छेलाल (27), अजमेरा संकेथ कुमार (35), अनुप दास (38), रिचा कुलकर्णी (54), आयुषी जैन (74), दाभोलकर वसंत प्रसाद (76) आणि उत्कर्ष कुमार (78) हे भागवत आणि त्यांच्या टीमने मार्गदर्शन केलेल्या टॉप 100 रँकर्समध्ये आहेत.
या मराठमोळ्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
डीजीपी महेश भागवत यांच्यासह मार्गदर्शक अधिकाऱ्यांमध्ये अभिषेक सराफ (IAS), आनंद पाटील (IAS), नितीश पाथोडे (IRS), विवेक कुलकर्णी, नीलकंठ आव्हाड (IAS), राजीव रानडे (IRS निवृत्त), मुकुल कुलकर्णी(IRS), सुप्रिया देवस्थळी (ICAS), डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशानंतर महेश भागवतांनी मार्गदर्शक टीमचे आभार मानले आहेत.
कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करतात?
महेश भागवत आणि त्यांचे मित्र, देशभरातील वरिष्ठ आयएएस अधिकार्यांचा समावेश असलेली टीम दररोज दोन तास देत मार्गदर्शन करतात. उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी तयार करण्यासाठी दररोज वृत्तपत्रे आणि संपादकीय पुरवून आणि उमेदवारांचे विषय, त्यांची मूळ राज्ये आणि स्वारस्य यावर आधारित प्रश्न विकसित करून इच्छुकांना प्रशिक्षण देत असतात. ते उमेदवारांना WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून प्रशिक्षण देतात, ज्यामध्ये 500 उमेदवार आहेत.
टॉपर इशिता किशोर म्हणते..
टॉपर इशिता किशोर महेश भागवत यांच्या टीमकडून झालेल्या मार्गदर्शनाबाबत बोलताना म्हणाली की, सरांनी दिलेलं मार्गदर्शन खूपच मदतीचे राहिलं आहे. चालू घडामोडींवरून त्यांनी सातत्याने माहिती दिली ज्याचा मला खूप फायदा झाला.
इतर महत्वाच्या बातम्या