एक्स्प्लोर

Telangana : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फुटी पुतळ्याचं अनावरण, हैदराबादमध्ये प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम

Dr. Ambedkar Statue in Hyderabad : तेलंगणाचे मुख्यमंत्री (Chief minister of Telangana) के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं.

KCR Unveil Dr. Babasaheb Ambedkar Statue : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 132 जयंतीच्या निमित्ताने हैदराबादमध्ये (Hyderabad) भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री (Chief minister of Telangana) के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं. या सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य पुतळा राज्य सचिवालयाच्या शेजारी आहे. 

दलित बांधव योजना राबवणार : मुख्यमंत्री

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी. राव यांनी सांगितलं की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर दलित बंधू योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल. 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'दलित बंधू योजने'मध्ये, अनुसूचित जातीच्या कुटुंबांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 100 टक्के अनुदान म्हणून 10 लाख रुपये दिले जातात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत दिलेल्या अनुदानाची परतफेड करण्याची गरज नाही.

'डॉ. बाबासाहेबांची कल्पनेहून सुंदर प्रतिमा'

केसीआर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचं कौतुक केले. कल्पनेपेक्षाही चांगला पुतळा बनवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी संविधानाचा कर्ता म्हणून तसेच सामाजिक न्यायासाठी लढणारा योद्धा म्हणून त्यांचे परिश्रम आणि बलिदान चिरंतन आहे. केवळ दलित, आदिवासी, बहुजनच नव्हे, तर भारतात जिथे-जिथे नागरिकांना भेदभावाचा सामना करावा लागला तिथे डॉ. बाबासाहेबांची महत्त्वाकांक्षा खरी ठरली. त्यांच्यासाठी आपण जे काही करू ते कमीच आहे.

2024 ला आमचं सरकार येईल : केसीआर 

केसीआर यांनी पुढे सांगितलं की, ''2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमचं सरकार येईल. काही शत्रूंना ते पचवता येणार नाही. पण प्रकाशासाठी एक ठिणगी पुरेशी आहे.'' राज्य सचिवालया शेजारी उभारण्यात आलेला हा पुतळा हा भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा आहे. राज्य सचिवालयाशेजारी बुद्ध पुतळ्यासमोर आणि तेलंगणा हुतात्मा स्मारकाशेजारी असलेला आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा लोकांना आणि संपूर्ण राज्य प्रशासनाला दररोज प्रेरणा देईल, असं मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.

भव्य सोहळ्याचं आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुतळ्याच्या अनावरणासाठी क्रेनच्या साहाय्याने मोठा पडदा हटवण्यात आला. मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विविध संगीत आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या अनावरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget