एक्स्प्लोर
सॅनिटरी पॅड 'चेक' करण्यासाठी शिक्षिकांनी विद्यार्थिनींचे कपडे उतरवले
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन शिक्षिकांना निलंबित केले आहे. यासोबतच एक कमिटी गठीत करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सचिवांना सोमवारपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून कारवाई करण्याचे सांगितले आहे.

चंदिगड : पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातल्या एका शाळेत सॅनिटरी पॅड दिल्यानंतर विद्यार्थिनींनी पॅड लावलेत की नाही याची चौकशी करण्यासाठी शाळेतील शिक्षिकांनीच विद्यार्थिनींचे कपडे उतरवले. याबाबत माहिती मिळताच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्या दोन शिक्षिकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात एक व्हिडियो समोर आला असून या व्हिडियोत काही विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार केली आहे. तीन दिवसांपूर्वी कुंडल गावातील त्यांच्या शाळेत शिक्षिकांनी आपल्याला कपडे उतरवले असल्याचे त्या विद्यार्थिनी या व्हिडियोत रडत सांगत आहेत.
या संतापजनक प्रकाराची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन शिक्षिकांना निलंबित केले आहे. यासोबतच एक कमिटी गठीत करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सचिवांना सोमवारपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून कारवाई करण्याचे सांगितले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सॅनिटरी पॅड मिळाल्यांनतर या शिक्षिकांनी शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनींनी पॅड लावले आहेत की नाही याबाबत चौकशी करत होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींचे कपडे उतरवले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























