GST Council Meeting: कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्क्यांचा जीएसटी कर लागू, 1 ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी
GST Council Meeting on Online Gaming: ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार असून सहा महिन्यांनंतर त्याचा आढावा घेतला जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
GST Council Meeting on Online Gaming : ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोडेस्वारी यांसारख्या खेळांवर 28 टक्के जीएसटी कर (GST On Online Gaming) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होणार असून निर्णय लागू केल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. नवी दिल्लीत जीएसटी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलची 51 वी बैठक (GST Council) आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली, गोवा आणि सिक्किम राज्यांनी ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी केंद्राकडे केली होती.
जीएसटी परिषदेच्या 51व्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोडेस्वारी यांसारख्या खेळांवर 28 टक्के जीएसटी कर लागू केला जाणार आहे. मागील तीन वर्षांच्या दीर्घ चर्चेनंतर ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंगवर कर लावण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्त्यांवर आज चर्चा केली.
#WATCH | Union Finance Minister Nirmala Sitharaman after the 51st GST Council meeting says, "The council in its last meeting had taken a decision about taxing, all the betting, gaming related activities, casinos, horse racing, online games... It was decided that all of them will… pic.twitter.com/CMTGREG8UD
— ANI (@ANI) August 2, 2023
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली, गोवा आणि सिक्कीमने ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. तर महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि बिहारसह इतर राज्ये ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याच्या बाजूने आहेत.
ही बातमी वाचा: