Tamilnadu Boiler Blast | तामिळनाडूतील न्यूवेली थर्मल प्लांटमध्ये स्फोट; सहा जणांचा मृत्यू
तामिळनाडूमधील न्यूवेली थर्मल प्लांटच्या स्टेज-2 वर एक बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला असून अपघातात 17 जण जखमी झाले आहेत. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
चेन्नई : तामिळनाडूतील न्यूवेली थर्मल प्लांटच्या स्टेज-2 वरील एका बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींवर एनएलसी लिग्नाइट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूवेली थर्मल प्लांटमध्ये कोळशापासून वीज निर्मीती करण्यात येत होती. प्लांटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्कू ऑपरेशन रावबण्यात आले.
प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट
आतापर्यंत स्फोटाच्या कारणांबाबत समजलेलं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमींची आणि मृतांची संख्या वाढू शकते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.
न्यूवेली थर्मल प्लांटबाबत माहिती
दरम्यान, कंपनी 3940 मेगाव्हॅट वीज निर्माण करते. तसेच ज्या प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. त्यामध्ये 1470 मेगाव्हॅट वीज निर्माण केली जाते. या कंपनीमध्ये 15 हजार कंत्राटी कामगारांसह जवळपास 27 हजार कर्मचारी काम करत असतात.
मानवाने आपल्या चुकांसाठी माफी मागावी : तापसी पन्नू
तामिळनाडूतील न्यूवेली थर्मल फ्लांटच्या स्टेज-2 वरील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळताच. यावर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आपली प्रतिक्रीया दिली आहे. तापसीने या अपघाताच्या घटनेवर दुःख व्यक्त केलं असून लोकांना एक आवाहनही केलं आहे.
कोरोना व्हायरससोबतच देश आणि जग सतत होणारे अपघात आणि घटनांनी त्रस्त असलेल्या तापसीचं म्हणणं आहे की, मानवाला सृष्टीची माफी मागण्याची गरज आहे. आपल्या ट्वीटमध्ये तापसीने लिहिलं आहे की, 'आता हे, आपण आतापर्यंत केलेल्या चुकांसाठी माफी मागू शकतो का? या धावपळीच्या जगात धावताना आपण हळूहळू नष्ट करत आहोत.'
महत्त्वाच्या बातम्या :
जम्मू काश्मीर - सोपोरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पथकावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
भारतीय सैन्याच्या तीन डिव्हिजन लडाखकडे
मोदींनी उल्लेख केलेले 'ते' पंतप्रधान कोण? त्यांना 13 हजारांचा दंड का भरावा लागला?