Tamil Nadu : डीएमके प्रमुख स्टॅलीन घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, 33 जणांचे असेल मंत्रिमंडळ
डीएमके (DMK) पक्षाचे प्रमुख स्टॅलिन (MK Stalin) आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी आज सकाळी दहा वाजता राजभवन येथे होणार आहे.
![Tamil Nadu : डीएमके प्रमुख स्टॅलीन घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, 33 जणांचे असेल मंत्रिमंडळ Tamil Nadu DMK head MK Stalin will take oath as CM today 33 other ministers in cabinet Tamil Nadu : डीएमके प्रमुख स्टॅलीन घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, 33 जणांचे असेल मंत्रिमंडळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/07/3d5e457d8b092600e6c430c4dfa762e5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चेन्नई : तामिळनाडू निवडणुकीतील विजयानंतर आता डिएमके प्रमुख स्टॅलीन आज राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी राजभवन परिसरात सकाळी 9 वाजता होणार आहे. स्टॅलीन यांच्या सोबत अन्य 33 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी बुधवारी स्टॅलीन यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं. डीएमकेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या नेते पदी स्टॅलीन यांची नियुक्ती केल्यानंतर तशा आशयाचे एक पत्र राज्यपालांना पाठवलं होतं.
पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महासचिव दुराई मुरुगन यांच्यासोबत स्टॅलीन यांनी पुरोहित यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
महत्वाचं म्हणजे, 2006 ते 2011 या दरम्यान डीएमके पक्षाची ज्या वेळी सत्ता होती त्यावेळी करुनानिधी मुख्यमंत्री होते आणि स्टॅलीन त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. आता स्टॅलिन पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये डीएमकेने 133 जागा जिंकल्या आहेत तर विरोधी असलेल्या एआयडीएमके पक्षाने 66 जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत डीएमकेला 32 जागांचा फायदा झाला असून डीएमकेच्या विजयात स्टॅलीन यांचा सिंहाचा वाटा आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)