डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटिबायोटिक घ्या : मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारीच्या 'मन की बात' कार्यक्रमात जनतेला आरोग्यविषयक सल्ला दिला. आकाशवाणीवरील 'मन की बात' या विशेष कार्यक्रमातून प्रधानमंत्री नेहमीच जनतेशी संवाद साधत असतात.
'मन की बात' कार्यक्रमात काल मोदींनी लोकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत काळजी घेण्याचं आवाहनही केलं. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी अँटीबायोटिक औषधांचा वापरही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा सल्ला दिला आहे. अँटीबायोटिक औषंधांचा वापर ही खूप मोठी समस्या आहे. या औषधांमुळे आजार तात्पुरता बरा होतो, पण त्याचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणावर आहेत. अँटीबायोटिकमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने डॉक्टरच्या सल्ल्यानेच याचा वापर करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.
त्याचसोबत गर्भावस्थेत होणारे मृत्यू आणि गुंतागुंत ही आपल्यासमोरची मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी गरोदर महिलांना प्रत्येक महिन्यात एकदा मोफत तपासणी करता येईल. भारतात गरोदर महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ही सुरक्षा मोहीम सुरु केली असून लवकरच तिचा फायदा घेता येणार आहे.
तसंच पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यूसंबंधी काळजी घेण्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.