एक्स्प्लोर
म्हणून मी पत्नीला ट्विटरवर फॉलो करत नाही : स्वराज कौशल
मुंबई : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ट्विटरवर सर्वसामान्यांनी मांडलेल्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी नावाजल्या जातात. व्हिसाचा प्रश्न असो, किंवा परदेशात अडकलेल्या भारतीयाची समस्या, स्वराज यांना ट्वीटमध्ये मेन्शन करताच त्या बहुतांश वेळा गंभीर प्रकरणांची तातडीने दखल घेतात. मात्र सुषमा यांचे पती म्हणजेच स्वराज कौशल चक्क त्यांना ट्विटरवर फॉलो करत नाहीत.
सुषमा स्वराज पतीला ट्विटरवर फॉलो करतात, मात्र मिस्टर स्वराज पत्नीला फॉलो करत नसल्याचं पाहून ट्विटराईट्सनाही आश्चर्य वाटलं. काही जणांनी याबाबत थेट स्वराज कौशल यांनाच प्रश्न विचारला असता, त्यांना मिळालेलं उत्तरही मजेदार आहे. तुम्ही पत्नी सुषमा स्वराज यांना का फॉलो करत नाही, या प्रश्नावर 'कारण मी लिबिया किंवा येमेनमध्ये अडकलेलो नाही' असं उत्तर त्यांनी दिलं.
यापूर्वीही स्वराज कौशल यांना एका यूझरने हाच प्रश्न विचारला होता. त्यावर 'मी तिला 45 वर्ष फॉलो करत आलो आहे. आता काही बदलू शकत नाही' असं मार्मिक उत्तर त्यांनी दिलं.
यापूर्वी एका तरुणीने कौशल यांना ट्वीट केलं होतं. 'सुषमाजींची मी खूप मोठी चाहती आहे. मात्र त्यांनी मला ब्लॉक केलं आहे. प्लीज मला अनब्लॉक करायला सांगा' या ट्वीटलाही मिस्टर स्वराज यांनी मजेदार उत्तर दिलं होतं. 'मी ती रिस्क घेऊ शकत नाही, कदाचित ती मलाही ब्लॉक करेल' अशी फटकेबाजी करत स्वराज कौशल यांनी ट्विटराईटलाच निरुत्तर केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement