एक्स्प्लोर
Advertisement
प्रियांका गांधी या 21 व्या शतकातील इंदिरा गांधी : सुशीलकुमार शिंदे
प्रियांका गांधी या 21 व्या शतकातील इंदिरा गांधी असल्याचं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज प्रियांका गांधींची काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. राहुल गांधींचं अभिनंदन करत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रियांका गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका गांधी या 21 व्या शतकातील इंदिरा गांधी असल्याचं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. 20 व्या शतकात इंदिरा गांधी होत्या 21 व्या शतकात प्रियांका गांधी आहेत. इंदिरा गांधी यांनी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश जिंकला, त्याचप्रमाणे प्रियांका गांधीही जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान काँग्रेसच्या या मास्टरस्ट्रोकवर भाजप टीका करणार, पण ते महत्वाचे नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही कधीपासून वाट पाहत होतो प्रियांका गांधींनी राजकारणात यावं. आता प्रियांका गांधी राजकारणात आल्यामुळे नुसतं पूर्व यूपी नाही तर संपूर्ण यूपीमध्ये परिणाम होईल. आमची तर आघाडी नाही आता आमचा यूपीमध्ये विजय होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज प्रियांका गांधींची काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. तसंच प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्त्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत. या निर्णयामुळे इतके दिवस पडद्यामागे काम करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. तसंच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची यावेळी निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याने प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशीही चर्चा रंगू लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement