Suryanamaskar : हैदराबादमध्ये होणार 75 कोटी सूर्यनमस्कार करण्याचा विश्वविक्रम
Suryanamaskar : 75 कोटी सूर्यनमस्कारांचा विश्वविक्रम करण्याची मोहिम आज दुपारी साडे चार वाजल्यापासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे.
Suryanamaskar : 75 कोटी सूर्यनमस्कारांचा विश्वविक्रम करण्याची मोहिम आज हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. दुपारी साडे चार वाजल्यापासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष मंत्री, योग गुरु स्वामी रामदेव हृदयविकारतज्ज्ञ दाजी यांच्या नेतृत्वाअंतर्गत 150 देशांतील लोक या मोहीमेत सहभागी होणार आहेत.
75 कोटींची सूर्यनमस्कार मोहिम ही भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आजोजित केली आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्याला 21 दिवस दिवसातून 13 वेळा सूर्यनमस्कार करावे लागणार आहेत. या मोहिमेत अनेक विद्यार्थीदेखील सहभागी होणार आहेत.
हमने भी जिद ऐसी ठानी है
— Tijarawala SK (@tijarawala) January 3, 2022
सर्वे भवंतु सुखिन: मानी है👍#75करोड_सूर्यनमस्कार
आजादी की 75वीं वर्षगांठ की बेला में#योगामृत_महोत्सव का शुभारंभ आज हैदराबाद में सायं 4.30 बजे👍
150 देशों के प्रतिनिधियों की भागीदारी से विश्व में एकता और स्वास्थ्य चेतना का शुभारंभ होगा@kamleshdaaji pic.twitter.com/ZfN2p8MHxi
या मोहिमेत 30 राज्य सहभागी होणार आहेत. 30 राज्यांतील 21,814 संस्थांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. तर 10,05,429 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
सूर्यनमस्कार कसे करावेत, जाणून घ्या
1) प्रणामआसन : सुरुवातीला सरळ उभं राहावं आणि नमस्कार करावा.
2) हस्तौत्तनासन : मग मागच्या बाजूला वाकावं.
3) हस्तपादासन : त्यानंतर कंबरेतून खाली वाकून दोन्ही हात पायांच्या शेजारी ठेऊन हनुवटी गुडघ्याला लावावी.
4) अश्व संचालनासन : त्यानंतर एक पाय मागे घेऊन, पुढचा पाय गुडघ्यात वाकवून पाठीची कमान करत मागे बघावं.
5) दंडासन : यानंतरच्या स्थितीमध्ये पायाचे चौडे, गुडघे, छाती आणि हनुवटी जमिनीला टेकवावी.
7) भुजंगासन : त्यानंतर पुढं सरका आणि छातीला उंचवा जणू फणा काढलेला नाग.
10) हस्त पादासन : कंबरेतून खाली वाकूत दोन्ही हात पायांच्या शेजारी ठेऊन हनुवटी गुडघ्याला लावावी.