एक्स्प्लोर
Advertisement
‘हार्दिक पटेलांच्या वयाच्या दुप्पट अण्णांचं सामाजिक काम’
‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचं आता जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे.’
नवी दिल्ली : ‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचं आता जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे.’ अशा शब्दात अण्णांच्या आंदोलनात पहिल्यापासून सोबत असणारे सुरेश पाठारे यांनी हार्दिक पटेल यांना उत्तर दिलं आहे.
‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचं आता जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे. ज्या-ज्या वेळेस अण्णांनी काँग्रेस असताना आंदोलनं केली त्यावेळेस त्यांना संघाचं ठरवलं गेलं. तर भाजपविरोधात आंदोलनं केली तर काँग्रेसधार्जिणं ठरवलं जातं.’ असं सुरेश पाठारे यावेळी म्हणाले.
‘...म्हणून आंदोलनाला यंदा गर्दी कमी’
‘2011चं आंदोलन आणि आत्ताचं आंदोलन यामध्ये लोकपाल हा विषय सोडला तर बाकी विषय हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे. शेतकरी हा या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. पूर्वीच्या आंदोलनात शहरी भागाशी निगडीत होते. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या तेव्हा जास्त होती. पण आता शेतकऱ्यांना दिल्लीत येणं थोडसं खर्चिक आहे. त्यामुळे आंदोलनाला गर्दी कमी आहे. यावेळस अण्णांनी आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर पोलिसांनी दिल्लीत येण्यास अडथळे निर्माण केले. तर अनेक ट्रेन रद्द केल्या. त्याचा परिणाम आंदोलनावर दिसत आहे. दरम्यान, जोपर्यंत ठोस कागदपत्र किंवा कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल.’ असं सुरेश पाठारे यावेळी म्हणाले.
‘हार्दिक पटेल तारतम्य नसल्यासारखं बोलत आहेत’
‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचं आता जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे. ज्या-ज्या वेळेस अण्णांनी काँग्रेस असताना आंदोलनं केली त्यावेळेस त्यांना संघाचं ठरवलं गेलं. भाजप विरोधात आंदोलनं केली तर काँग्रेसधार्जिणं ठरवलं गेलं. पण जनतेला अण्णांबाबत आणि त्यांच्या आंदोलनांबाबत गेल्या 40 वर्षापासून माहिती आहे. हार्दिक तारतम्य नसल्यासारखं बोलत आहेत. त्यांना इथे येऊन स्टेजवर बोलायचं आहे. तशी त्यांची इच्छा दिसते. पण अण्णांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला स्टेजवरुन भाषण देता येणार नाही. हवं तर ते पाठिंबा देण्यासाठी इथं येऊ शकतात.’ असंही पाठारे म्हणाले.
अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस : हार्दिक पटेल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामागे संघाची फूस असल्याचा सनसनाटी आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने काल (रविवार) केला होता. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत हार्दिकने हा आरोप केला.
गेल्या चार दिवसांपासून रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. शनिवारी हार्दिक पटेल अण्णांच्या भेटीसाठी जाणार होता. मात्र हार्दिकला व्यासपीठावर येऊ न देण्याची भूमिका अण्णांनी घेतली. त्यानंतर डिवचल्या गेलेल्या हार्दिक पटेलनं अण्णांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवली.
शेतकऱ्यांनी आंदोलन स्वत:च्या हातात घेतल्यानं सरकार अस्वस्थ आहे. त्यामुळे हा आक्रोश शांत करण्यासाठी आंदोलन संघाच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप हार्दिक पटेलनं केला.
“मला जी माहिती मिळाली त्यानुसार अण्णा मला मंचावर येऊ देणार नव्हते. पाठीमागेच भेटणार होते. पण मुळात आमच्यासारख्या आंदोलकांना का दूर ठेवत आहेत? विरोधी पक्षांच्या आंदोलनातल्या सहभागावर अण्णांचा इतका आक्षेप का? मागच्या आंदोलनात विरोधी पक्ष नव्हते का? मग आताच इतकी टोकाची भूमिका का? तुम्ही जे मुद्दे उचलत आहात, त्याला विरोधी पक्षांचीही साथ असेल तर त्यांची इतकी अॅलर्जी का?”,असे प्रश्न हार्दिकने अण्णांना विचारले आहेत. तसेच, दिल्लीवाल्यांच्या इशाऱ्यावर मला काल येऊ दिलं नाही, असा आरोपही हार्दिकने केला.
संबंधित बातम्या :
अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस : हार्दिक पटेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सोलापूर
क्रिकेट
पुणे
Advertisement