एक्स्प्लोर
प्रवाशाशी असंवेदनशील वर्तन, स्पाईसजेटला दहा लाखांचा दंड
मुंबई : सेरिब्रल पाल्सी झालेल्या प्रवाशाला विमानातून खाली उतरवल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्पाईसजेट विमान कंपनीला दणका दिला आहे. पीडितेला 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
19 फेब्रुवारी 2012 रोजी जिजा घोष या स्पाईसजेटच्या विमानाने कोलकात्याहून गोव्याला निघाल्या होत्या. तेव्हा त्यांना जबरदस्तीनं विमानातून उतरवण्यात आलं. याप्रकरणाची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत स्पाईसजेटची चांगलीच कानउघडणी केली. ही संवेदनशून्यता असल्याचं सांगत कोर्टाने स्पाईसजेटला झापलं.
जिजा यांना चांगली वागणूक मिळाली नाही, त्यांच्यासोबत भेदभाव करण्यात आला, असा ठपका स्पाईसजेटवर ठेवला. तसेच 10 लाख रुपये जिजा यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement