एक्स्प्लोर
Advertisement
पर्रिकरांच्या शपथविधीला स्थगिती नाही, बहुमतासाठी 2 दिवसांचा अवधी!
नवी दिल्ली: गोवा सत्ता स्थापनेच्या पेचावर सुप्रीम कोर्टात काँग्रेस विरुद्ध भाजपचा सामना रंगला. कोर्टानेही राज्यपालांप्रमाणेच निर्णय देत, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 16 मार्चला म्हणजे दोनच दिवसात सकाळी 11 वाजता बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
याशिवाय मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली.
तसंच नवं सभागृह अस्तित्त्वात आल्याचं आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना काढण्याची विनंती निवडणूक आयोगाला उद्याच करावी लागणार आहे.
गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी केली असतानाच, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याने मोठा पेच निर्माण झाला .
अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात काँग्रेसची बाजू मांडली, तर भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे मैदानात उतरले.
सुप्रीम कोर्टाचे काँग्रेसला प्रश्न
- सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश खेहर जे, रंजन गोगोई आणि जे आर के अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर गोव्याच्या रणसंग्राम रंगला.
- काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका केल्याने, सरन्यायाधीश खेहर यांनी पहिलाच प्रश्न काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना केला.
- तुमच्याकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे किंवा कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, याबाबत काही कागदपत्र सादर केली आहेत का?
- तुम्ही किती आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखवलं असतं, तर ही केस अवघ्या 30 सेकंदात निकाली निघाली असती, असंही कोर्टाने सिंघवींना सांगितलं.
- तुम्हाला त्यासाठी पुरेसा वेळ होता, एक संपूर्ण रात्रही होती. तडजोडीसाठी रात्रीचीच वेळ चांगली असते, मात्र तरीही तुम्हाला कुणाचा पाठिंबा आहे, हे सांगणारं एक कागदाचं चिटूरही सादर करता आलं नाही, असा मिश्किल टोला कोर्टाने लगावला.
- तुमचं जे म्हणणं राज्यपालांसमोर मांडायला हवं होतं, ते कोर्टासमोर मांडत आहात. तुम्ही कोर्टात येण्यापूर्वी राज्यपालांकडे म्हणणं मांडणं आवश्यक होतं.
- तुम्ही राज्यपालांकडेही तुम्हाला पाठिंबा असलेल्या आमदारांबाबत किंवा संख्याबळाबाबत काहीही सांगितलं नाही आणि आता तुम्ही कोर्टाला म्हणता, हा गुंता सोडवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
राजकारण
Advertisement