एक्स्प्लोर

Supreme Court Live Stream : सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस; सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच CJI साठी लाईव्ह स्ट्रिमिंग

Supreme Court Live Stream : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस; SC मध्ये प्रथमच CJI साठी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जात आहे.

Supreme Court Live Stream : भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief Justice NV Ramana) आज म्हणजेच, 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अशातच CJI NV रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कामकाजाचं लाईव्ह स्ट्रिमिंग  (Live Streamed) केलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 2018च्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. 

दरम्यान, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, आज म्हणजेच, 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच, 24 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. रमण्णा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती उदय लळीत (Justice Uday Lalit) 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

रमण्णा देशाच्या पुढच्या सरन्यायाधीशांसोबत बेंच शेअर करतील 

परंपरेनुसार, एन. व्ही. रमण्णा त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी देशाच्या पुढील सरन्यायाधीशांसोबत बेंच शेअर करतील. रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक खंडपीठासमोर त्यांचा निरोप समारंभ पार पडेल. आज CJI रमण्णा CJI नियुक्त न्यायमूर्ती UU ललित यांच्यासोबत बेंच शेअर करतील.

सर्वोच्च न्यायालयाच्या कम्प्युटर सेलनं दिली लाईव्ह स्ट्रीमची माहिती 

सर्वोच्च न्यायालयाच्या कम्प्युटर सेलद्वारे जारी करण्यात आलेल्या नोटिशीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, "माननीय सरन्यायाधीशांच्या न्यायालयाची कार्यवाही, म्हणजेच समारंभ खंडपीठ NIC च्या माध्यमातून वेब पोर्टलद्वारे 26 ऑगस्ट 2022 पासून सकाळी 10:30 AM पासून थेट प्रक्षेपित केली जाईल." 

तुम्ही माझ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलाय : CJI एन. व्ही. रमण्णा 

दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशननं आयोजित केलेल्या निरोपाच्या कार्यक्रमात मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा म्हणाले की, "मला वाटतंय की, तुम्ही माझ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला आहे. मी मुख्य न्यायाधीश म्हणून माझं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मी दोन मुद्दे उपस्थित केले, ते तुम्हा सर्वांना माहीत आहेच. एक म्हणजे, पायाभूत सुविधा आणि दुसरा म्हणजे, न्यायाधीशांची नियुक्ती. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कॉलेजियम यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आम्ही उच्च न्यायालयांमध्ये सुमारे 224 न्यायाधीशांची यशस्वीपणे नियुक्ती केली आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Embed widget