Smoking Ban : धूम्रपान करण्यासाठी वयोमर्यादा 21 वर्ष करा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
Smoking Ban : धूम्रपान करण्यासाठीची वयोमर्यादा 18 हून 21 वर्ष करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.
Smoking Ban : धूम्रपान करण्यासाठीची वयोमर्यादा 21 वर्ष करण्याची मागणी करणारी याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली. ही याचिका जनजागृतीपेक्षा प्रचार करणारी अधिक असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. याचिकेत धूम्रपान करण्याचे वय 18 हून 21 करावे, सुट्ट्या सिगारेटची विक्री बंद करावी अशी मागणी करण्यात आली होती.
न्या. एस. के. कौल आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जर प्रसिद्धी हवी असेल तर एखाद्या चांगल्या मुद्यावर याचिका दाखल करा. प्रसिद्धीसाठी अशा याचिका दाखल करू नका, असेही कोर्टाने याचिकाकर्त्याला खडसावले.
एयरपोर्ट में सिगरेट पीने के लिए बनाए गए स्मोकिंग ज़ोन को हटाने, धूम्रपान की आयु 18 से बढ़ा कर 21 साल करने और शैक्षणिक संस्थानों, हॉस्पिटल के पास खुले सिगरेट की बिक्री रोकने की मांग सुनने से SC ने मना किया। कहा- यह जनहित याचिका की जगह प्रचार के लिए दाखिल याचिका ज़्यादा लगती है।
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) July 22, 2022
अॅड. शुभम अवस्थी आणि सप्तर्षी मिश्रा यांनी धुम्रपानावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. याचिकेत धूम्रपानासाठी वयाची मर्यादा 18 वर्षाहून 21 करण्यासह विमानतळ, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने आदी ठिकाणी असलेली स्मोकिंग झोन हटवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात जीएसटी कराबाबतही याचिका दाखल करण्यात आली. केंद्र सरकराने जीएसटी परिषदेच्या शिफारसीनंतर वैद्यकीय उपकरणांवर जीएसटी लागू केला आहे. त्याविरोधात याचिका दाखल केली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या ब्रेल पेपर, व्हिलचेअरवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.