एक्स्प्लोर
Sunanda Pushkar Case : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता
Sunanda Pushkar Case: सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयानं काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

shashi
Sunanda Pushkar Case: सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयानं काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. शशी थरुर यांनी पत्नीशी क्रूर वर्तन केल्याचा आणि सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. तीन हजार पानांच्या आरोपपत्रात केवळ थरुर यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला होता.
सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुरांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका
सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूच्या आठवडाभर आधी पतीला ईमेल केला होता. 'आपला जगण्यातील रस संपला आहे. मृत्यू यावा अशीच माझीच प्रार्थना आहे' अशा आशयाचा मजकूर सुनंदा यांनी ईमेलमध्ये लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप सुनंदा पुष्कर यांनी सोशल मीडियावरुन केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. सुनंदा पुष्कर या 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या 345 क्रमांकाच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता.
आणखी वाचा























