एक्स्प्लोर

15 लाखांची नोकरी सोडून युवकाचा सेंद्रीय शेतीचा प्रयोग, आज होतेय दीड कोटी रुपयांची उलाढाल

Success Story: आज आपण एका युवकाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. या युवकानं 15 लाख रुपयांची नोकरी सोडून शेती सुरु केली आहे.

Success Story : अलिकडच्या काळात अनेक तरुण नोकरी (Job) सोडून शेती (Agriculture) करताना दिसत आहेत. शेतीच्या माध्यमातून मोठा नफा मिळवत आहेत. आज आपण अशाच एका युवकाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. या युवकानं 15 लाख रुपयांची नोकरी सोडून शेती सुरु केली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील खजरी गावातील राहुल कुमार असं या युवक शेतकऱ्याचं नाव आहे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून या शेतकऱ्यानं नवी क्रांतीी घडवली आहे. 

राहुल यांना एकेकाळी 15 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी होती. राहुलने इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यानंतर पॉवर प्लांटमध्ये काम केले. मात्र रासायनिक शेतीचे कुटुंबाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहून त्यांनी नोकरी सोडून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडला.

कर्करोगाने वडील आणि मुलगा गमावला

B.Tech आणि MBA शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुलने सुमारे 15 वर्षे एका पॉवर प्लांटमध्ये काम केले, परंतु वडील आणि मुलाला कर्करोगासारख्या गंभीर आजाराने गमावल्यानंतर, या समस्यांचे मूळ रासायनिक शेतीतून उत्पादित केलेले धान्य आणि भाजीपाला असल्याचे लक्षात आले. याबाबत विचार केल्यानंतर त्यांनी 2018 मध्ये नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक शेती समजून घेऊन ती प्रभावीपणे अंगीकारण्यासाठी राहुल यांनी राज्य सरकारच्या मदतीने देशातील विविध संस्था आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले. ते जीवामृत, गांडूळखत आणि नीमस्त्रासारखी सेंद्रिय उत्पादने तयार करायला शिकले आणि इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षित शेती आणि मशरूम उत्पादनासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब केला.

शेती क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार 

शेती क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल राहुल यांना नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया 2024' सारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 2022 मध्ये त्यांना आग्रा येथे ऑरगॅनिक इंडिया पुरस्कार मिळाला. 2023 मध्ये, त्यांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सेंद्रिय शेती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

राहुल यांच्याकडे 10 एकर जमीन, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, मूग आणि भाजीपाला पिकांचं उत्पादन

राहुल यांच्याकडे 10 एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, मूग आणि भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतलं आहे. नैसर्गिक खते आणि सेंद्रिय पद्धती वापरून त्यांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारला आहे. याशिवाय ते दूध आणि मशरूमचे उत्पादनही घेत आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, काळा गहू आणि इतर धान्यांचा समावेश असलेल्या "रसायनमुक्त नवरत्न पीठ" हे राहुलचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. हे पीठ त्यांच्या सेंद्रिय प्रक्रिया युनिटमध्ये तयार केले जाते, जे ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. या युनिटने परिसरातील 50 हून अधिक गरजूंना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

वर्षाला दीड कोटी रुपयांची उलाढाल

राहुल  कंपनीत 15 लाखांच्या पॅकेजवर काम करत होते, आता शेती केल्यानंतर त्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांची उत्पादने गुरुग्राम, नोएडा, पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये पाठवली जात आहेत. राहुल "श्रीराम ऑरगॅनिक फार्मर्स ग्रुप" ही कंपनी चालवतात, ज्यासोबत 600 हून अधिक शेतकरी जोडलेले आहेत. ते शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास प्रेरित करतात. त्यांच्या या यशाने आजूबाजूचे शेतकरीही रसायनमुक्त शेतीकडे वळले योग्य विचार आणि कठोर परिश्रमाने आपण केवळ आपलीच नाही तर समाजाचीही दिशा बदलू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांचे आभार व्यक्त करताना ते म्हणतात, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी हितकारक धोरणांमुळेच आज या पदापर्यंत पोहोचलो आहोत.

महत्वाच्या बातम्या:

success story : गगनभरारी! 5000 रुपयांचं कर्ज घेऊन सुरु केला व्यवसाय, आज 400 कोटी रुपयांची उलाढाल  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines7 PM 15 March 2025Bhandara Farmer : महिला शेतकऱ्याची उत्तुंग भरारी, शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोगABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Embed widget