मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Covaxin च्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस
दोन ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी Covaxin लसीचा वापर करण्यात यावा अशी महत्वपूर्ण शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने DCGI कडे केली आहे.
Covaxin : देशातील कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) कार्यक्रम शंभर कोटी डोसच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होत असून दोन ते 18 वर्षाच्या मुलांना कोरोनाची लस लवकरच मिळणार आहे. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन (Covaxin) लस लहान मुलांना देण्यात यावी अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे केली आहे.
देशातील 18 वयोगटातील बहुतांशी लोकसंख्येचे जलद गतीने लसीकरण करण्यात येत आहे. अशावेळी लहान मुलांना कधी लस देणार याबाबत काही स्पष्टता नव्हती. आता या विषयातील सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या शिफारसीनंतर लहाम मुलांवरील लस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
Subject Expert Committee (SEC) has given a recommendation to DCGI (Drugs Controller General of India) for the use of BharatBiotech's Covaxin for 2-18 year olds: Official sources
— ANI (@ANI) October 12, 2021
भारताममध्ये अनेक राज्यांमधील शाळा हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. त्यात देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत होती. या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा 18 वर्षाखालील मुलांना जास्त असल्याचंही सांगण्यात येत होतं. त्यामुळे लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसीवर काम करत आहेत.
पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी अमेरिकेची कंपनी नोवावॅक्सच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीनं भारतात या लसीचं नाव कोवावॅक्स ठेवलं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सीरम इंस्टीट्यूटला 7 ते 11 वयोगटातील मुलांवरील लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.
कंपनीने ही ट्रायल देशभरातील 100 मुलांवर केली आहे. मात्र या लसीच्या आपत्कालीन वापराला देशात अद्याप तरी मंजुरी मिळालेली नाही. देशात केवळ झायडस कॅडिलाच्या लसीलाच 12 वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली आहे.
संबंधित बातम्या :
- Corona Vaccination: 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस लवकरच येईल का? फायझरने FDA कडे मागितली परवानगी
- Vaccine For Children: सीरम इंस्टिट्यूटला मिळाली 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलला परवानगी
- Corona vaccination: देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता