(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'JNU मध्ये विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखलं', ABVP ने दिलं स्पष्टीकरण
JNU Controversy: जेएनयूमध्ये नॉनव्हेज खाण्यावरून वाद झाला असून, या संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
JNU Controversy: जेएनयूमध्ये नॉनव्हेज खाण्यावरून वाद झाला असून, या संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जेएनयू मेस वादावर विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले आहेत की, काही जहालांच्या माध्यमातून अपप्रचार केला जात आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाला काय खायचे याचे स्वातंत्र्य आहे, मात्र काही विद्यार्थी तेथे रामनवमीच्या दिवशी पूजा करत होते. याला डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. मात्र तिथे कोणत्याही प्रकारची हाणामारी झाली नसल्याचं ते म्हणाले आहेत.
यामध्येच जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष साई बाला यांनी दावा केला आहे की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखले आहे. साई बाला म्हणाल्या की, नवरात्रीत विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखण्यात आले होते. अभाविपने विद्यार्थ्यांना मेसमध्ये नॉनव्हेज खाण्यापासून रोखल्याचा व्हिडीओ त्यांनी जारी केला आहे. त्याचवेळी अभाविपने अशा आरोपांचे खंडन केले आहे. हा व्हिडीओ जेएनयूच्या कावेरी वसतिगृहातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
एन साई बाला यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, अभाविपच्या गुंडांनी कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखले. जेएनयूचे कुलगुरू या गुंडगिरीचा निषेध करणार का? आता विद्यार्थ्यांनी काय खायचे हे देखील ठरवलं जाणार का? मेसच्या सेक्रेटरीलाही मारहाण करण्यात आली, या गुंडगिरीविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. भारताच्या विचारसरणीवर हल्ला होत आहे.
याबाबत स्पष्टीकरण देत अभाविपने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त कावेरी वसतिगृहात पूजा आणि हवनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पूजेला जेएनयूचे विद्यार्थी आणि मुली मोठ्या संख्येने जमल्या होत्या. त्याचवेळी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूजेला विरोध केला. त्यांनी संपूर्ण प्रकरण राईट टू फूड आणि व्हेज-नॉन-व्हेज भोवती फिरवण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Covid 19 Precaution Dose : बूस्टर डोस घ्या... पण कसा? नोंदणीपासून किमतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
- श्रीलंकेत लाखो तरूणांचा एल्गार, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची केली मागणी
-
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1054 नवे रुग्ण, 29 जणांचा मृत्यू
- जयंत पाटलांचा 112 आपत्कालीन नंबरला फोन! 15 मिनिटात मिळाली पोलिसांची मदत