(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SSC GD Constable 2021: एसएससीची मोठी भरती, 25 हजारपेक्षा अधिक पदं, आज शेवटची तारीख
SSC GD Constable Recruitment 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी आणि रायफलमॅन जनरल ड्यूटी (Constable GD) या पदांसाठी 25,271 पदांची भरती घोषित केली आहे.
SSC GD Constable Recruitment 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी आणि रायफलमॅन जनरल ड्यूटी (Constable GD) या पदांसाठी 25,271 पदांची भरती घोषित केली आहे. यासाठी फॉर्म भरण्याची आज 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी एसएससीची ऑफिशियल वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन आजच्या आज अर्ज भरावा लागणार आहे.
या भरती अंतर्गत बॉर्डर सेक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्र्रियल सेक्युरिटी पोर्स, सशस्त्र सीमा पोलिस बल आणि असम रायफल्ससाठी एकूण 25,271 पदांची भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी उमेदवार हा दहावी पास असणं आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराचं वय 18 ते 23 वर्ष असावं
गेल्या 17 जुलैपासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आज हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख 2 सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. तर ऑफलाइन चालान जनरेट करण्यासाठी 4 सप्टेंबर 2021 पर्यंत अवधी आङे.
या भरतीसाठी उमेदवारांना लेखी आणि शारिरीक चाचणी द्यावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी एसएससीची ऑफिशियल वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन भेट द्यावी.