एक्स्प्लोर

Lockdown3 | विशेष रेल्वे तिकीटाच्या बुकिंगला आज संध्याकाळपासून सुरुवात!

लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्यानंतर आता सर्वसामान्य प्रवाशांसाठीही रेल्वे विशेष सेवा सुरू करणार आहे. त्यासंदर्भात रेल्वेने विशेष गाइडलाईन्स आणि वेळापत्रक जारी केलं आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्यानंतर आता सर्वसामान्य प्रवाशांसाठीही रेल्वे विशेष सेवा सुरू करणार आहे. या विशेष रेल्वे सेवांची वाहतूक मंगळवार, 12 मे 2020 पासून होणार आहे. राजधानी नवी दिल्लीतून देशभरातल्या 15 ठिकाणी या रेल्वेसेवा सुरू केल्या जातील. 15 ट्रेन जाणार आणि तिथून दिल्लीत परतणार अशा 30 फेऱ्यांना रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.

रेल्वेने यासंदर्भात गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. सुरुवातीला 15 मोठ्या शहरांमध्ये या ट्रेन्स सुरु करण्यात येणार आहेत. स्पेशल ट्रेन्सची बुकिंग 11 मे म्हणजेच, सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरु करण्यात येणार आहे.

रेल्वेने ज्या 15 मार्गांवर रेल्वे सेवा सुरु करण्याचे आदेश दिले, ते पुढिलप्रमाणे :

  • दिल्ली ते पटना
  • दिल्ली ते रांची
  • दिल्ली ते मुंबई
  • दिल्ली ते जम्मू
  • दिल्ली ते चेन्नई
  • दिल्ली ते बंगळुरू
  • दिल्ली ते तिरुअनंतपुरम
  • दिल्ली ते डिब्रूगढ़
  • दिल्ली ते भुवनेश्वर
  • दिल्ली ते सिकंदराबाद
  • दिल्ली ते भुवनेश्वर
  • दिल्ली ते मडगांव
  • दिल्ली ते अगरतला
  • दिल्ली ते बिलासपुर
  • दिल्ली ते हावडा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला या स्पेशल ट्रेनमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी IRCTC ची वेबसाइट www.irctc.co.in वर किंवा IRCTC च्या मोबाईल अॅपवर तिकिटांची ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे. तिकीट बुकींगची सुरुवात आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.

  • सर्व लोक तिकिट बुक करू शकतील.
  • तिकिट काउंटरवर बुकींग करता येणार नाही.
  • सात दिवसापर्यंत पुढचं बुकिंग करता येणार
  • केटरिंग चार्जेस तिकीटत घेणार नाही.
  • ज्यांना कन्फर्म तिकिट मिळणार त्यांनाच प्रवास करता येणार आहे.
  • फक्त एसी कोच असणाऱ्या ट्रेन्स धावणार आहेत.
  • ट्रेनचं भाडं राजधानी एक्सप्रेसप्रमाणे लागू होणार
  • या ट्रेन्समध्ये जनरल कोच नसणार
  • या ट्रेन लिमिटेड स्टेशन्सवर थांबणार
  • ट्रेनचं टाइमटेबल जारी करण्यात येणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे :

  • प्रवास कमीत कमी एक तास आधी स्टेशनवर पोहोचणं बंधनकारक असणार आहे.
  • स्क्रिनिंगनंतर लक्षणं नसणाऱ्या लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.
  • प्रवासादरम्यान मास्क घालणं सर्व प्रवाशांसाठी अनिर्वाय असणार आहे.
  • सर्वांच्या मोबाइल फोन्समध्ये आरोग्य सेतु अॅप असणं अनिर्वाय आहे.
  • तिकिट बुकिंगमध्ये कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही.
  • तत्काळ, प्रीमियम तत्काळ आणि करंट बुकिंग करता येणार नाही.
  • ट्रेनमध्ये ब्लॅकेट्स, चादर यांसारख्या सुविधा प्रवाशांना मिळणार नाही.
  • IRCTC कडून पेमेंट बेसिस वर काही खाद्यपदार्थ आणि पाणी बॉटल उपलब्ध केली जाईल.
  • ट्रेनमध्ये पॅन्ट्रीकार असणार नाही, प्रवासादरम्यान, खाण्यासाठी काहीही मिळणार नाही. त्यामुळे आपलं जेवणं स्वतःसोबत घेऊन यायचं आहे.
स्पेशल ट्रेन्सचं वेळापत्रक : 
क्रमांक ट्रेन नंबर कोणत्या स्थानकावरून (वेळ) कुठपर्यंत(वेळ) फ्रीक्वेंसी कोणत्या स्थानकांवर थांबणार? कधीपासून सुरु होणार ट्रेन?
स्पेशल ट्रेन हावडा (16:50) नवी दिल्ली(10:00) दररोज धनबाद जंक्शन, गया जंक्शन, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल 12 मे 2010,
2 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली(16:55) हावडा(09:55) दररोज धनबाद जंक्शन, गया जंक्शन, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल 13 मे 2020
3 स्पेशल ट्रेन राजेंद्र नगर (19:00) नवी दिल्ली(07:40) दररोज पटना जंक्शन, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल 12 मे 2020
4 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली(17:15) राजेंद्र नगर(05:30) दररोज पटना जंक्शन, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल 13 मे 2020
5 स्पेशल ट्रेन डिब्रूगढ(20:35) नवी दिल्ली(10:15) दररोज दीमापुर, गुवाहाटी, न्यू बोंगाइगांव, न्यू जलपाईगुड़ी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, दानापुर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल 14 मे 2020
6 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली(16:10) डिब्रूगढ(07:00) दररोज दीमापुर, गुवाहाटी, न्यू बोंगाइगांव, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरोनी जंक्शन, दानापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल 12 मे 2020
7 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली(20:40) जम्मू तवी(05:45) दररोज लुधियाना 12 मे 2020
8 स्पेशल ट्रेन जम्मू तवी(19:40) नवी दिल्ली(05:00) दररोज लुधियाना 13 मे 2020
9 स्पेशल ट्रेन बंगळुरू(20:00) नवी दिल्ली(05:55) दररोज अनंतपुर, गुंटाकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपुर, भोपाल जंक्शन, झाशी जंक्शन 12 मे 2020
10 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली(20:45) बंगळुरु(06:40) दररोज अनंतपुर, गुंटाकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपुर, भोपाल जंक्शन, झाशी जंक्शन 14 मे 2020
11 स्पेशल ट्रेन तिरुअनंतपुरम (19:15) नवी दिल्ली (12:40) मंगळ, गुरुवार, शुक्रवार अर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मैंगलोर, मडगांव, पनवेल, वडोदरा, कोटा 15 मे 2020
12 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली (10:55) तिरुअनंतपुरम (05:25) मंगळ, बुध, रविवार अर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मैंगलोर, मडगांव, पनवेल, वडोदरा, कोटा 13 मे 2020
13 स्पेशल ट्रेन चेन्नई सेंट्रल (06:05) नवी दिल्ली (10:25) शुक्रवार, रविवार विजयवाडा़, वारंगल, नागपुर, भोपाल, झाशी, आगरा 15 मे 2020
14 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली (15:55) चेन्नई सेंट्रल (20:40) बुधवार, शुक्रवार विजयवाडा़, वारंगल, नागपुर, भोपाल, झांसी, आगरा 13 मे 2020
15 स्पेशल ट्रेन बिलासपूर (14:00) नवी दिल्ली (10:55) सोमवार, गुरुवार रायपूर जंक्शन, नागपूर, भोपाल, झांसी 14 मे 2020
16 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली (15:45) बिलासपूर (12:00) मंगल, शनि रायपुर जंक्शन, नागपूर, भोपाल, झाशी 12 मे 2020
17 स्पेशल ट्रेन रांची (17:10) नवी दिल्ली (10:55) गुरुवार, रविवार पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल 14 मे 2020
18 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली (16:00) रांची (10:30) बुध, शनि पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल 13 मे 2020
19 स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रल (17:00) नवी दिल्ली (08:35) दररोज वडोदरा, रतलाम, कोटा 12 मे 2020
20 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली (16:25) मुंबई सेंट्रल (08:15) दररोज वडोदरा, रतलाम, कोटा 13 मे 2020
21 स्पेशल ट्रेन अहमदाबाद (17:40) नवी दिल्ली (07:30) दररोज पालनपूर, अबु रोड, जयपूर, गुड़गांव 12 मे 2020
22 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली (19:55) अहमदाबाद (09:40) दररोज पालनपूर, अबु रोड, जयपूर, गुडगांव 13 मे 2020
23 स्पेशल ट्रेन अगरतला(18:30) नवी दिल्ली (11:20) सोमवार बदरपूर जंक्शन, गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, पाटलिपुत्र, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन 18 मे 2020
24 स्पेशल ट्रेन नवी दिल्ली (19:50) अगरतला (13:30) बुधवार बदरपुर जंक्शन, गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, पाटलिपुत्र, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन 20 मे 2020
25 स्पेशल ट्रेन भुवनेश्वर (09:30) नवी दिल्ली (10:45) दररोज हिजली(खडगपूर), मूरी बोकारो स्टील सिटी, गया, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल 13 मे 2020
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्व प्रवाशांनी सर्व गाइडलाइन्सचं पालन करणं अनिर्वाय असणार आहे. सर्वात आधी तिकिटांचं ऑनलाईन बुकिंग होणार आहे. त्यामुळे स्टेशनवर जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. दिल्लीहून फक्त 15 ठिकाणांसाठी ट्रेन सोडण्यात येणार आहेत. पॅसेंजर ट्रेन्सचा मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेन्सशी काहीही संबंध नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget