एक्स्प्लोर
Advertisement
जम्मूमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांकडून पोलिसाची हत्या
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहडा परिसरात एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची त्याच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहडा परिसरात एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची त्याच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. मुश्ताक अहमद शेख असं हल्ल्यात मृत पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
या हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यावरील हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिजबेहडा परिसरातील काटू वापजान गावातल्या मुश्ताक यांच्या घरात दहशतवादी घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांनी काल (गुरुवार) शोपियामध्ये लष्कराच्या तुकडीवर देखील हल्ला केला. पण सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets