एक्स्प्लोर

Sonu Sood : केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना एअरलिफ्ट, सोनू सूदचं मदतकार्य सुरुच

सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. आता त्याने केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना एअरलिफ्ट करत सुखरुपरित्या घरी पोहोचवलं आहे.

मुंबई : चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारा अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेकांचा दबंग हिरो बनला आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेल्या परप्रांतियांना आपापल्या घरी स्वखर्चाने पोहोचवत आहेत. आतापर्यंत त्याने तब्बल 12 हजारांपेक्षा जास्त परप्रांतियांना आपल्या घरी पोहोचवून हजारो कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. आता पुन्हा एकदा त्याने केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहोचवलं आहे. सोनूने केरळमधील या 177 मुलींना विमानाने त्यांच्या घरी पोहोचविण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे या सर्व मुली एर्नाकुलममधील एका फॅक्ट्रीमध्ये शिवणकाम आणि भरतकाम-विणकामांच काम करतात. या अडकलेल्या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका मित्राने सोनूला दिली. त्यानंतर सोनूने यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या सर्व मुलींना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केल्याबद्दल मला खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सोनूने एबीपी न्यूजला दिली. Sonu Sood : केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना एअरलिफ्ट, सोनू सूदचं मदतकार्य सुरुच या मुलींना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्याने सरकारकडून भुवनेश्वर आणि  कोची  विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर सोनूने बंगळुरुवरुन एक स्पेशल एअरक्राफ्ट मागवून या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं. सोनूने या सर्व मुलींना सुखरुप भुवनेश्वरला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी तात्काळ सरकारकडून भुवनेश्वर आणि कोच्ची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. परवानगी मिळताच या मुलींना कोची येथून जाण्यासाठी बंगळूरहून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. ‘लॉकाडाऊनमुळे या सर्व मुली केरळमध्ये अडकल्या होत्या, पण आता लवकरच त्या भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचतील. माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंद दुसरा कोणताही असू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया सोनूने दिली. Sonu Sood : केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना एअरलिफ्ट, सोनू सूदचं मदतकार्य सुरुच दरम्यान सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला होता. सोनूनेही त्यांना उत्तर देत मदतीचं आश्वासन दिलं. सोनूने केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Sonu Sood EXCLUSIVE कोरोनाच्या संकटात परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलेला 'दबंग'सोनू सूद एबीपी माझावर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget