Skymet Monsoon Forecast 2023 : यंदा अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार : स्कायमेट वेदरची माहिती
Skymet Monsoon Forecast 2023 : यंदा मान्सून अंदमानमध्ये उशिराने दाखल होण्याचा अंदाज आहे. स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने ही माहिती दिली आहे.
Skymet Monsoon Forecast 2023 : यंदा मान्सून (Monsoon) अंदमानमध्ये (Andaman) उशिराने दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामानाची माहिती देणारी स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा त्याची सुरुवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. तसंच केरळात (Kerala) नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात (Monsoon Forcast) आताच सांगणं कठीण असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.
भारतीय हवामान विभाग एक-दोन दिवसात माहिती देणार
तर एकीकडे स्कायमेटने मान्सून अंदमानात उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला असताना भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) पुढील एक ते दोन दिवसात अंदमानात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे.
महाराष्ट्रात 9 जून तर मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन : वेगारीस ऑफ द वेदर
वेगारीस ऑफ द वेदरकडून (Vagaries of the Weather) केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे.
'या' कारणामुळे मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर
दरम्यान दक्षिण भारतीय महासागर परिसरात एक चक्रीवादळ तयार होत असल्याने बाष्प तिकडे ढकलले जातील. अशात मादागास्कर परिसरात उच्च दाब तयार होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता अशात मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर होण्याचा अंदाज आहे.
यंदा मान्सून कसा? स्कायमेट आणि आयएमडीचा वेगवेगळा अंदाज
स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो.
मान्सूनची वाटचाल कशी असते?
22 मे - अंदमान
1 जून - केरळ
7 जून - महाराष्ट्र
11 जून - मुंबई
VIDEO : Skymate Weather : मान्सूनचं आगमन लांबणीवर जाणार, अंदमानात मान्सून उशिराने दाखल होणार
संबंधित बातमी