एक्स्प्लोर

ना पैसे, ना दागिने; हडकुळ्या तरुणाने प्रोटीन पावडर चोरली!

किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे या चोराला कोणीतरी सप्लिमेंट पावडर घेण्याचा सल्ला दिला.

नवी दिल्ली : पैसे, दागिन्यांसाठी चोरी झाल्याच्या घटना आपण कायम ऐकतो. पण दिल्लीत एका चोराने चक्क प्रोटीनची चोरी केली. 20 वर्षांचा हा हडकुळा चोर, ज्याचं वजन केवळ 35 किलो असावं, त्याने पिळदार शरीरयष्टीसाठी प्रोटीन सप्लिमेंटची चोरी केली. रोहिणीतील सेक्टर-8 मधील प्रोटीन शॉपमध्ये सोमवारी दुपार ही घटना घडली. किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे या चोराला कोणीतरी सप्लिमेंट पावडर घेण्याचा सल्ला दिला. मग आरोपी तरुण मित्रांसह प्रोटीन सप्लिमेंट विकणाऱ्या दुकानात गेला. दुकानदाराच्या डोक्याला पिस्तूल लावून, लाखो रुपयांच्या प्रोटीन बॅग घेऊन तो पसार झाला. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी त्याने दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआरही (रेकॉर्डर) सोबत घेऊन गेला. सिक्स पॅकच्या हट्टापायी चुकीचा आहार, तरुणाच्या हृदयात ब्लॉकेज नेमकं काय घडलं? या प्रोटीन शॉपमध्ये सोमवारी दुपारी किरकोळ शरीरयष्टीचा आरोपी आला आणि त्याने पिळदार बॉडी बनवण्यासाठी पावडर मागितली. प्रमाणापेक्षा जास्त प्रोटिन खाणं आरोग्यासाठी अपायकारक असून यासाठी जिम ट्रेनरचा सल्ला घे, असं दुकानदाराने त्याला सांगितलं. मात्र आरोपीने आपला हट्ट सोडला नाही, परंतु दुकानदारही आपल्या मतावर कायम राहिल्याने तो तिथून निघून गेला. थोड्या वेळात आरोपी परत आला आणि दुकानदाराला ब्रॅण्ड लिहून देण्यास सांगितलं. दुकानदाराने लिहायला सुरुवात केली असता, आरोपीने त्याचा हात मुरगळला आणि डोक्याला पिस्तूल लावून धमकी दिली. याचवेळी आरोपीचे दोन मित्र दुकानात आले आणि लाखो रुपयांचे प्रोटिनची पाकिटं आणि औषधं घेऊन पसार झाले. उत्तर रोहिणीमधील पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000

रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा

Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो

Embed widget