(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभेला प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत पराभव, आता भाजपला वैष्णोदेवी तरी पावणार का? मतदारसंघात कोण आघाडीवर?
लोकसभा निवडणुकीत अयोध्या आणि उत्तराखंडाच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे गेलेल्या भाजपच्या या सीटचा काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Shri Mata Vaishno Devi Vidhan Sabha Seat Result: लोकसभा निवडणुकीत अयोध्या आणि अयोध्येत बांधलेले राम मंदिर हा देशात भाजपच्या निवडणूक प्रचारसाठी सर्वात मोठा मुद्दा होता. परंतु याच रामनगरीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला होता. परंतु कलम 370 रद्द झाल्यावर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकांत मात्र जम्मू काश्मीरमधील एका जागेवर भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. जम्मू काश्मीरच्या कटरा येथील त्रिकुट पर्वतावर माता वैष्णो देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. वैष्णो देवी हे हिंदूंचे धार्मिक स्थळ असल्याने या विधानसभेची ही जागा सध्या चर्चेत आहे. ऐन नवरात्रीत माता वैष्णो देवी भाजपला पावली असून भाजपचे बलदेव राज शर्मा हे सध्या आघाडीवर आहेत.
श्री माता वैष्णो देवी विधानसभा मतदारसंघाच्या आतापर्यंत सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपचे बलदेव राज शर्मा हे 2381 मतांनी आाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार जुगल किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार भूपेंद्र सिंह आहेत . त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत अयोध्या आणि उत्तराखंडाच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे गेलेल्या भाजपच्या या सीटचा काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मतदारसंघात कोण आघाडीवर?
माता वैष्णोदेवी विधानसभा जागेवर एकूण 8 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये भाजपचे बलदेव राज शर्मा, काँग्रेसचे भूपेंद्र सिंह, जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रताप कृष्ण शर्मा आणि चार अपक्ष उमेदवार होते. बन्सी लाल, जुगल किशोर, राक कुमार आणि शाम सिंह अशी त्यांची नावे आहेत.
मतदासंघ पुनर्रचनेनंनतर वैष्णो माता मतदारसंघ अस्तित्वात
जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 अंतर्गत अनेक नवीन विधानसभा जागा निर्माण करण्यात आल्या. त्यापैकी एक श्री माता वैष्णोदेवी विधानसभा जागा होती. यापूर्वी ही जागा रियासी विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येत होती. मतदासंघ पुनर्रचनेनंनतर अरनास और रियासीचे काही भाग एकत्र करत हा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. यामध्ये कटरा, भोमग, भाबर ब्राह्मण आणि कोटलीच्या भागाचा समावेश आहे
जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष
जम्मू काश्मीरमधील निवडणुकांना यावेळी अतिशय महत्त्व होतं. कलम 370 रद्द झाल्यावर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकांत मात्र जम्मू काश्मीरच्या जनतेनं भाजपला नाकारल्याचं दिसतंय. नॅशनल कॉन्फरन्स हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीने कलांमध्ये अर्धशतक पार केलंय. तर भाजपला 30 चा आकडाही गाठता आलेला नाही.
हे ही वाचा :