एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jammu Kashmir election Result 2024: कलम 370 हटवूनही भाजपला फायदा नाही; 10 वर्षांनी निवडणूक, काय सांगतो जम्मू-काश्मीरचा निकाल?

Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: भाजपसाठी जम्मू आणि काश्मीरची 2024 ची विधानसभा निवडणूक महत्वाची होती.

Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या (Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024) 90 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास सर्व मतमोजणीचे सर्व कल हाती आले आहेत. 

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024) 90 जागांपौकी सध्या नॅशनल कॉन्फरन्स 35, भाजप 28, काँग्रेस 14, पीडीपी 3 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे. भाजपसाठी जम्मू आणि काश्मीरची ही निवडणूक महत्वाची होती. कारण जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तेथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आल्याने याचा भाजपला फायदा होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र जम्मूमध्ये भाजपला अल्प प्रतिसाद मिळाला, तर काश्मीर खोऱ्यातही भाजपची झोळी रिकामीच राहणार असल्याचं दिसून येत आहे.

भाजपचे जम्मू मिशन अयशस्वी?

जम्मू-काश्मीरमधील कल पाहता भाजपचे जम्मूतील ध्येय पूर्णपणे फसल्याचे दिसते. वास्तविक, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 111 जागा होत्या. त्यापैकी 46 जागा काश्मीरमध्ये आणि 37 जागा जम्मूमध्ये होत्या. तर चार जागा लडाखच्या खात्यात गेल्या. याशिवाय 24 जागा पीओकेमध्ये येतात. लडाख वेगळे झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 107 जागा उरल्या होत्या. अशा परिस्थितीत, नवीन परिसीमन अंतर्गत, जम्मू-काश्मीरमध्ये 114 जागा कमी करण्यात आल्या, त्यापैकी 90 जागा जम्मू-काश्मीरमध्ये आणि 24 जागा पीओकेमध्ये ठेवण्यात आल्या. जम्मू-काश्मीरमध्येही 43 जागा जम्मू आणि 47 जागा काश्मीरला गेल्या. म्हणजेच नव्या परिसीमानुसार जम्मूमध्ये सहा जागा वाढल्या, तर काश्मीरमध्ये फक्त एक जागा वाढली. आता 2014 च्या विधानसभा निवडणुकांवर नजर टाकली तर भाजपने जम्मूमध्ये 37 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. आता जम्मूमध्ये 43 जागा असूनही भाजप केवळ 24 जागांवरच पुढे असल्याचे दिसत आहे.

नॅशनल कॉन्फरन्सची ऐतिहासिक कामगिरी-

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कामगिरीत तिप्पट सुधारणा असल्याचं दिसून येत आहे. 2014 ला नॅशनल कॉन्फरन्सला 15 जागा, यावेळी 35 जागांपेक्षा अधिक जागा जिंकत असल्याचं दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या कामगिरीतही ऐतिहासिक सुधारणा झाली आहे.  भाजपला गेल्यावेळी 25 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 28 जाग जिंकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पीडीपीचा मात्र अभूतपूर्व दारुण पराभव होत असल्याचं दिसत आहे. 2014 ला 28 जागा जिंकणाऱ्या पीडीपीला यावेळी दोनच जागा जिंकणं शक्य असल्याचं सध्याच्या कलानूसार दिसत आहे. 

संबंधित बातमी:

Haryana Election Results: ऑलिम्पिकमध्ये अपात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढावCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Mahayuti Government: गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
भाजपला मुख्यमंत्रीपद गेल्यास गृहमंत्रीपद आमच्याकडे, हा नैसर्गिक नियम; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
Embed widget