Bande Math Basavalinga Swamiji : कंचूगल बंडेमठाचे पीठाधीश बसवलिंग स्वामीजी यांची आत्महत्या; तीन पानांच्या सुसाईड नोटमध्ये धमक्या मिळाल्याची नोंद
Bande Math Basavalinga Swamiji : कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधिशांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कंचूगल बंडेमठ हा प्रसिध्द मठ आहे.
Bande Math Basavalinga Swamiji : कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधिशांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्वामीजींच्या आत्महत्येची आज दीपावलीच्या दिवशी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या स्वामीजींचे नाव बसवलिंग स्वामीजी Bande Math Basavalinga Swamiji (वय 45) असे त्यांचे नाव आहे. आपल्या राहत्या खोलीत स्वामीजींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाईट नोट लिहिली आहे. काही जण माझ्याबाबत अपप्रचार करत आहेत, मी कधीही कोणाचेही वाईट चिंतले नाही. काही जणांकडून मला धमक्याही आल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठ हा प्रसिध्द मठ असून मठाच्या भक्तांची संख्याही मोठी आहे. मठाच्या प्रांगणात मठातर्फे शाळा आणि महाविद्यालय चालवले जाते. मठाची पन्नास कोटींहून अधिक मालमत्ता आहे. स्वामिजींवर काही आरोप करण्यात आल्याने स्वामीजींनी प्रतिष्ठेला धक्का बसेल म्हणून आत्महत्या केली असावी असे चर्चिले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या