एक्स्प्लोर
रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, बुरखा बंदीवरुन शिवसेनेचा मोदींना सवाल
श्रीलंकेने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत पण पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत असल्याचेही अग्रलेखातून म्हटले आहे.
मुंबई : श्रीलंकेतील साखळी स्फोटानंतर राष्ट्रपती मैत्रीपाल यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या निर्णयाची री आता शिवसेनेनं ओढली आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेनं श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाब बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केलीए. मोदी आज अयोध्या दौऱ्यावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही पंतप्रधान मोदींना केलाय.
श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी हिंदुस्थानला त्याचे हादरे बसले आहेत. शेजारधर्म तर आहेच, पण लंकेशी आपले धार्मिक आणि भावनिक संबंधदेखील आहेत. सरकारी आकडा काहीही असला तरी कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत पाचशेहून जास्त निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला.
UNCUT | सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेनं युती केली, राज ठाकरे यांचं भाषण | पनवेल | एबीपी माझा
हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले.
श्रीलंकेने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत पण पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत असल्याचेही अग्रलेखातून म्हटले आहे.
फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
VIDEO | ज्यांचे उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्त्व नाही, आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement